Congress President Election 2022 esakal
देश

Congress : खर्गेंनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडलं; सोनिया गांधींकडं राजीनामा केला सुपूर्द

मल्लिकार्जुन खर्गे यापुढं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहणार नाहीयत.

सकाळ डिजिटल टीम

मल्लिकार्जुन खर्गे यापुढं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहणार नाहीयत.

Congress President Election 2022 : काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यापुढं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहणार नाहीयत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडं सुपूर्द केला आहे.

काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद' या तत्त्वानुसार खर्गे यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशिवाय शशी थरूर, के. एन. त्रिपाठीही आहेत. शुक्रवारी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी तिन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ज्येष्ठ नेते खर्गे हे मूळचे कर्नाटकचे आहेत. तर, रिंगणात असलेले तिसरे उमेदवार के. एन त्रिपाठी हे झारखंडचे माजी मंत्री आहेत.

80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवारी अर्जांचे 14 संच सादर केले. त्यांच्या समर्थनामध्ये अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, एके अँटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. याशिवाय, खर्गेंच्या समर्थनामध्ये आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), मनीष तिवारी आणि भूपेंद्र हुडा यांसारखे नेते आहेत, ज्यांचा पक्ष बदलाची मागणी करणार्‍या G-23 या गटात समावेश आहे.

निवडणूक कधी होणार?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 22 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT