Congress-Sonia-Gandhi
Congress-Sonia-Gandhi 
देश

RSS महात्मा गांधींना बाजूला करण्याचा प्रयत्न करतंय : सोनिया गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी (ता.2) केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. महात्मा गांधी यांना बाजूला करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचे प्रतीक बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी जयंतीनिमित्त राजघाट येथे त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

गांधीजींच्या वचनांची उजळणी करणे सोपे आहे; पण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे मात्र महाकठीण. गांधीजींच्या नावाचा वापर करणारी मंडळी खुलेपणाने इतरांची दिशाभूल करत असून, आपणच किती शक्तिशाली आहोत, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या देशाची मूलभूत संरचना ही गांधी मूल्यांवर आधारित असल्याने त्यांना यामध्ये यश आलेले नाही.

गांधीजी जगभर अहिंसेसाठी ओळखले जात असत, हुकूमशाहीसाठी नाही, असा टोलाही सोनियांनी लगावला आहे. सत्ता आपल्याच हातात आहे, असा विचार करणारी मंडळी गांधीजींचे स्वराज्य आणि देशाप्रतीचे निःस्वार्थ प्रेम कधीच समजू शकत नाहीत. गांधीजी हे प्रेमासाठी ओळखले जातात द्वेषासाठी नाही, महात्मा गांधी हे लोकशाही मानणारे आहेत, हुकूमशाही नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी बोलताना लगावला. 
 

काँग्रेसने क्रांती केली 

काँग्रेसने गांधीजींच्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशात क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. पंडित नेहरू, राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग आदींची नावे घेता येतील. देशात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले, असे सांगत त्यांनी बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवरूनही सरकारवर टीका केली.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT