Congress sachin sawant jibe at bjp over Cow hug Day celebration on 14 November Valentine Day 2023
Congress sachin sawant jibe at bjp over Cow hug Day celebration on 14 November Valentine Day 2023  
देश

Valentine Day 2023 : 'काऊ हग डे' वरून काँग्रेसचा भजपला खोचक टोला; त्या दिवशी 'सिली सोल्स'मध्ये…

सकाळ डिजिटल टीम

Valentine Day 2023 : 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात शाजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. संपूर्ण जगात तसेच भारतातही लोक त्याबद्दल उत्सुक आहेत.

मात्र भारतात आता हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जाणार आहे. गाईला आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस 'काऊ हग डे' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे समोर आले आहे.

या निर्णयानंतर आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीनी 'काऊ हग डे' गोवा आणि इंशान्येकडील राज्यांमध्ये देखील साजरा होणार का असा खोचक सवाल केला आहे. (Cow hug Day celebration on 14 November Valentine Day 2023 )

पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा, असे आवाहान प्राणी कल्याण मंडळाने केले आहे.

यादरम्यान 14 नोव्हेंंबर रोजी बीफ खाण्यावर बंदी नसलेल्या गोवा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील हा गायींना मिठी मारली जाणार आहे का? तसेच बीफ विकलं जात असल्याचा आरोप झालेले भाजप नेत्या स्मृती इराणी यांची मुलीचे कथित हॉटेल सिली सोल्स येथे या दिवशी खास उत्सव असेल का? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

काँग्रेसने नेमकं काय म्हटलंय?

"प्रिय भाजप, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांना काऊ हग डे लागू होईल का? किरेन रिजिजू हे गायींना मिठी मारतील? त्या दिवशी #SillySouls मध्ये विशेष सेलिब्रेशन असणार आहे का? सहज विचारतोय" असं खोचंक ट्विट काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

पत्रात नेमकं काय?

AWBA जारी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, आपल्या सर्वांना माहित आहे की गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली संस्कृती आणि वारसा विसरला आहे. गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करावा.

तसेच हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा असे AWBA ने पत्रात म्हटले आहे. गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ती जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्वस्व देणार्‍या मातेप्रमाणे पोषण देणार्‍या स्वभावामुळे ती कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखली जाते असे AWBA ने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT