Yogi Adityanath 
देश

UP Yogi: 'काँग्रेस बेशरम, मुस्लिमांना गोमांस खाण्याचा अधिकार देऊ पाहत आहे'; योगी आदित्यनाथ यांचा गंभीर आरोप

CM Yogi Adityanath serious allegation: देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

कार्तिक पुजारी

लखनऊ- देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसला मुस्लिमांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे, असा दावा त्यांनी केला आहे. यूपीतील एका सभेत ते बोलत होते.

योगी आदित्यनाथ सभेला संबोधित करताना म्हणाले की, 'हे बेशरम लोक अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार देण्याचे आश्वासन देतात. आपल्या ग्रंथामध्ये गाईला माता म्हटलं जातं. ते आपल्या गोमातेला खाटकाच्या हातात देऊ पाहात आहेत. भारत कधी अशांना स्वीकार करेल का?' योदी आदित्यनाथ यांच्या टीकेनंतर काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.(serious allegation on Congress)

योगी म्हणाले की, 'काँग्रेस अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीचे अन्न खाण्याची परवानगी देऊ पाहात आहे. म्हणजेच ते गोहत्या करण्याची परवानगी देण्याचं म्हणत आहेत.' योगी संबल लोकसभा मतदारसंघासाठी भाजप उमेदवार परमेश्वल लाल सैनी यांच्या समर्थनासाठी मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी गावात प्रचारसभा घेत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस स्त्रीधनाला जप्त करु पाहात आहे. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना ही संपत्ती ते देऊ पाहात आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामधून लोकांच्या संपत्तीचा एक्स रे करणार असल्याचं म्हटलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री योगी यांनी हल्ला चढवला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर अशाच प्रकारचे आरोप केले होते.

तुमच्याकडे चार खोल्या असतील तर त्यातील दोन खोल्या ते हिसकावतील. काँग्रेस म्हणते की ते महिलांच्या दागिन्यांवर ताबा मिळवेत. देश याला कधीही स्वीकारणार नाही. काँग्रेसने कर्नाटकमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न केला होता, अशी टीका आदित्यनाथ यांनी केल आहे. दरम्यान , देशात एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यातील दोन टप्प्यातील मतदान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT