Bharat Jodo Yatra Karnataka esakal
देश

Congress : सोनिया गांधींनी भारत जोडो यात्रेला लावली हजेरी; राहुल गांधींसोबत फक्त दहाच मिनिटं चालल्या

सोनिया गांधींच्या आगमनानं भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

सकाळ डिजिटल टीम

सोनिया गांधींच्या आगमनानं भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.

Bharat Jodo Yatra Karnataka : काँग्रेसच्या (Congress) अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज (गुरुवार) कर्नाटकातील मंड्या (Karnataka Mandya) जिल्ह्यात भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) हजेरी लावली. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत सोनिया गांधी फक्त 10 मिनिटं कार्यकर्त्यांसोबत चालल्या.

यानंतर त्या पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या. सोनिया गांधींच्या आगमनानं भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 3700 किमीहून अधिक अंतर कापावं लागणार आहे.

सोनिया गांधींनी मंड्या जिल्ह्यातील डाक बंगला भागातून पदयात्रेला सुरुवात केली. त्या प्रथमच भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनियांची ही पदयात्रा महत्वाची मानली जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, 'सोनिया गांधी या यात्रेत सामील झाल्या, हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळं कर्नाटकात पक्ष आणखी मजबूत होईल.'

कर्नाटकात विजय आमचाच असेल : डीके शिवकुमार

यादरम्यान कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, सोनिया गांधी कर्नाटकात आल्या आणि त्या भारत जोडी यात्रेत सहभागी झाल्या, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. येत्या काळात राज्यात आमची सत्ता येणार असून भाजपची दुकानदारी बंद होणार आहे, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई सरकारला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT