Chief Minister
Chief Minister Sakal
देश

काँग्रेसमधून भाजपात आले अन् CM झाले; माणिक साहा चौथे मुख्यंमत्री

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर माणिक साहा यांनी आता त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. माणिक साहा हे त्रिपुराचे भाजप अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

(Manik Saha Take Oaths As Tripura's New CM)

दरम्यान बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी साहा यांच्या नावाची घोषणा केली होती. काँग्रेसमधून भाजपात आले आणि मुख्यमंत्री झाले असे चार मुख्यमंत्री ईशान्येकडील राज्यात आत्तापर्यंत झाले आहेत. त्यामध्ये माणिक साहा हे चौथे मुख्यमंत्री आहेत.

आज त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली आणि त्रिपुराला नवे मुख्यमंंत्री मिळाले आहेत. ईशान्येकडील राज्यात साहा हे पाचवे असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आणि मुख्यमंत्री झाले.

१) हिमंता बिस्वा सर्मा (आसाम)

हिमंता बिस्वा सर्मा यांनी आसामचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून २०२१ मध्ये शपथ घेतली आहे. सर्बानंद सोनोवाल यांच्या जागी त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. हिमंता यांनी २०१५ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

२) एन. बिरेन सिंग (मणिपूर)

एन बीरेन सिंग यांनी 2016 मध्ये काँग्रेस रामराम केला आणि भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर एका वर्षाने विधानसभा निवडणुका झाल्या व त्यात भाजपाचा विजय झाला. 15 वर्षांनंतर राज्यात बिगर-काँग्रेस सरकार स्थापन झाले आणि भाजपने एन बिरेन सिंग यांना मुख्यमंत्री केले.

३) नेफियू रिओ (नागालँड)

सलग तीन निवडणुका जिंकणारे नेफियु रिओ हे नागालँडमधील पहिले मुख्यमंत्री आहेत. रिओ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते पण 2002 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली होती. नागालँडच्या मुद्द्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एससी जमीर यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला होता.

४) माणिक साहा (त्रिपुरा)

माणिक साहा यांनी २०१६ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. ते सध्या त्रिपुराचे भाजपा अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी आज त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT