Sangrur Lok Sabha Election
Sangrur Lok Sabha Election esakal
देश

प्रसिद्ध गायकाच्या हत्येनंतर काँग्रेस मुसेवालाच्या वडिलांना देणार तिकीट?

सकाळ डिजिटल टीम

गायक मुसेवाला यांच्या हत्येचा परिणाम पंजाबच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

चंदीगड : प्रसिद्ध गायक सिध्दू मुसेवाला (Singer Sidhu Moosewala) यांच्या निधनाचा परिणाम पंजाबच्या राजकारणावर स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यात 23 जून रोजी संगरूर लोकसभा निवडणूक (Sangrur Lok Sabha Election) होत असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 जून आहे. आम आदमी पक्षानं संगरूर जिल्हा प्रमुख गुरमेल सिंह यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय. तर, दुसरीकडं मुसेवाला यांच्या हत्येनंतर काँग्रेसला (Congress) त्यांच्या वडिलांना या जागेवरून उभं करायचं आहे.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी गायक सिध्दू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शिफारस केलीय. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना मुसेवाला यांच्या वडिलांना बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय. मात्र, या जागेवर काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या सुनील जाखड आणि सुखदेवसिंह धिंडसा यांना तिकीट देण्याचा विचार भाजप करत आहे. शिरोमणी अकाली दल या जागेवर 'पंथक' उमेदवार उभं करण्याच्या बाजूनं आहे.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. विद्यमान मुख्यमंत्री मान हे 2014 आणि 2019 मध्ये संगरूरमधून विजयी झाले होते. आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) संगरूर पोटनिवडणुकीत आपले पत्ते उघडताना गुरमेल सिंह यांचं नाव निश्चित केलं आहे. ते 2013 पासून 'आप'शी संबंधित आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकाळात ते एकमेव सरपंच होते, ज्यांनी 300 मतांनी निवडणूक जिंकली होती. प्रख्यात अर्थतज्ज्ञ सरदार सिंह जोहल यांनी गायक सिध्दू मुसेवाला यांच्या वडिलांना संगरूर लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आणण्याची सूचना केलीय. यानंतर काँग्रेसचे सर्वेसर्वा राजा वडिंग हे मुसेवाला यांच्या वडिलांना उमेदवारी देण्याच्या बाजूनं दिसत असले, तरी माजी कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंहला आणि धुरी येथील दलबीर सिंग गोल्डी हेही तिकीटाच्या दावेदारांमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujrat Video: 'माझ्या बापाची EVM आहे'; भाजप नेत्याचा मुलाने मतदान केंद्रातूनच केलं इन्स्टाग्राम लाईव्ह

Jobs: 2024मध्ये जवळपास 50 टक्के कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Hardik Pandya : हंगामातील खराब कामगिरीनंतर हार्दिकबाबत MI मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय? कामकाजावर सिनियर खेळाडूंचीही नाराजी

Sheetal Mhatre : ''खासदारकीसाठी तुम्ही दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?'', शीतल म्हात्रेंचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT