mahua moitra esakal
देश

नवरात्रीत मांसविक्रीवर बंदी; महुआ मोईत्रा म्हणाल्या, मटण खाण्याचं स्वातंत्र्य

तृणमूल कॉंग्रसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं ट्विट

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीमुळे दिल्लीत अनेक ठिकाणी मांसविक्रीला बंदी घालण्यात आली. यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसताय. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सकाळी ट्विट करुन,''मी दक्षिण दिल्लीत राहते, मला जेव्हा हवंय तेव्हा मटण खाण्याचं स्वातंत्र्य घटना देते, आणि मटणविक्रेत्याला त्याचं दुकान चालवण्याचं, असं म्हटलंय. (Trinamool congress MP Mahua moitra twits on Meat ban during Navratri)

दक्षिण दिल्ली महापालिकेचे महापौर मुकेश सुर्यन यांनी दक्षिण दिल्लीत नवरात्री दरम्यान मांसविक्रीला बंदी घातलीय. अनेक नागरीकांच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. चैत्र महिन्यात साजरी केली जाणाऱ्या या नवरात्री उत्सवात देवीला मांस आणि कांदा-लसूण चालत नाही, त्यामुळे मांसविक्री बंद करण्यात आली. मांसविक्रीच नसेल तर लोक मांस खाणार नाहीत. काही इस्लामिक देशांमध्ये रमजान महिन्यात सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यावर निर्बंध असतात हेही तसंच असल्याचं महापौर मुकेश यांनी म्हटलंय.

दक्षिण दिल्लीप्रमाणेच उत्तर दिल्लीत देखील मासविक्रीची दुकाने बंद होती. नवरात्रीत ९० टक्के लोक मटण खात नसल्याचं महापौर श्यामसुंदर आगरवाल यांनी म्हटलंय. अनेक मांसविक्रेत्यांनी भीतीपोटी आपली दुकानं बंद ठेवली होती. मंगळवारी बहुतेक जण मटण खात नसल्याने, तसंही अनेक भागात मासविक्रिची दुकानं बंद असतात. साऊथ दिल्लीमध्ये 1500 मांसविक्रीची दुकानं आहेत. दिल्लीकरांच्या भावनांचा आदर ठेवत मांसविक्री बंद केल्याचं साऊथ दिल्लीच्या महापौरांनी सांगितलंय. बऱ्याचदा उघड्यावर मांस कापलं जातं. त्यामुळे उपवास ठेवणाऱ्या मंडळींना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT