narendra_modi
narendra_modi 
देश

कोरोना स्थिती गंभीर; पंतप्रधान मोदींनी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काही दिवसांपूर्वी देशात 8 ते 9 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. पण, आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चिंता वाढली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा 26 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 मार्चला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना स्थिती बिघडत चालल्याने राज्यात नव्या कठोर निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अनेक राज्ये कर्फ्यू करण्याबाबत विचार करत आहेत. शिवाय अनेक राज्यांमध्ये हळूहळू निर्बंध लावले जात आहेत. लोकांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पंतप्रधान मोदींनी 17 मार्च म्हणजे उद्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हर्चुअल असून दुपारी बारा वाजता ती सुरु होईल. पंतप्रधान मोदींनी याआधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत मोदी कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि लसीकरण मोहिमेच्या गतीची समिक्षा करतील. 

राज्यातील कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतेय. अशात राज्यात पुन्हा भीषण परिस्थिती ओढावू नये म्हणून राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येतील असं वक्तव्य महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारकडून सोमवारी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. सर्व सिनेमा हॉल (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स), हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेवर सुरु राहतील. लग्नसमारंभात केवळ ५० जणांनाच परवानगी राहील, नियमांचे पालन झाले नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. नागपूरमध्ये पूर्णपणे टाळेबंदी करण्यात आली आहे.

पंजाबमध्ये नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. शाळा आणि कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्येही नाईट कर्फ्यू लावली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यांसदर्भात संकेत दिले आहेत. शिवाय त्यांनी राज्यात नवे नियम जारी केले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT