Covid 19 Nasal Vaccine Sakal
देश

Nasal Vaccine Price : नेझल व्हॅक्सिनच्या किंमतीबाबत मोठी अपडेट; मोजावे लागणार इतके पैसे

चीनमधील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येनंतर भारतासह अनेक देश सतर्क झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Nasal Vaccine Price : चीनमधील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येनंतर भारतासह अनेक देश सतर्क झाले आहेत.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

वाढत्या रूग्णसंख्येनंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहव करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यानंतर आता या लसीच्या किमतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकावाटे देण्यात येणाऱ्या iNCOVACC लसीची किंमत खासगी रूग्णालयांमध्ये 800 + 5% GST म्हणजेच १००० मोजावे लागतील तर, सरकारी रूग्णालयांमध्ये यासाठी 325 रुपये मोजावे लागणार आहेत.

जानेवारीच्या अखेरीस उपलब्ध होईल

कोवॅक्सिन किंवा कोविशील्डने पूर्णपणे लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी इंट्रानेझल लसीला यापूर्वी बूस्टर शॉट म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारीच्या अखेरीस ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ही लस जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.

भारतातील कोरोनाची स्थिती

भारतात गेल्या २४ तासात एकूण १५७ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या ४,४६,७७,४५९ झाली असून, सध्या देशभरात ३,४२१ रूग्णांवर उपचार केले जात आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.८० टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. तर, दैनिक संसर्ग दर ०.३२ टक्के इतका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

Dhule Municipal Election : धुळ्यात मतदानापूर्वीच भाजपचा गुलाल! दोन महिला उमेदवार बिनविरोध; विरोधकांना मोठा धक्का

Narayangaon Protest : जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक कधी थांबणार; डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू; धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन!

SCROLL FOR NEXT