BF.7 Variant Sakal
देश

Corona New Variant : तुमच्या शरीरात BF.7 व्हेरिएंट आहे का कसे ओळखाल?

चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नव्या BF.7 व्हेरिएंटमुळे हाहाकार माजला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Corona New BF.7 Variant : चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नव्या BF.7 व्हेरिएंटमुळे हाहाकार माजला आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

चीनमधील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येनंतर भारतासह अनेक देशांनी सावध पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून भारत सरकारने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

भारतात येणाऱ्या दैनंदिन रुग्णांची संख्या नियंत्रणात असतानाही, केंद्राकडून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

BF.7 म्हणजे काय?

आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉन व्हेरिएंट येऊन गेले आहेत. यातील डेल्टाने भारतासह अनेक देशात हाहाकार माजवला होता. त्यानंतर आलेल्या ओमिक्रॉन आला होता. त्यानंतर आता चीनमध्ये BF.7 व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. चीनमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येण्यापूर्वी हा व्हेरिएंटचे रूग्ण पहिल्यांदा यूएस आणि युरोपमध्ये आढळूल आले होते.

कसे ओळखाल तुम्ही BF.7 संक्रमित आहात?

BF.7 संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉनप्रमाणेच लक्षणे दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. जसे की, घसा खवखवणे, थकवा, नाक वाहणे, खोकला आणि ताप आदी लक्षणांचा समावेश आहे. तर काही व्यक्तींना लूज मोशन आणि पोटदुखी सारखी लक्षणे दिसून येऊ शकतात.

या व्हेरिएंटमध्ये लागण झालेल्या कोणत्याही रूग्णांना आतापर्यंत रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. मात्र, याच्या संसर्गानंतर काहींना न्यूमोनिया झाला आहे. या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी लशीचा चौथा डोस उपयुक्त ठरू शकतो असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर : वरील लेख सामान्य माहितीच्या आधारावर आहे. अद्यापपर्यंत आरोग्य विभागाकडून नव्या व्हेरिएंटबाबतची कोणतीही लक्षणं जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होत असल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT