covid 19.
covid 19. 
देश

Corona Updates: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 71 लाखांच्या वर

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 71 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 66 हजार 732 रुग्ण आढळले आहेत तर 816 जणांचा मृत्यू झाला आहे.

 आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 71 लाख 20 हजार 539 झाला असून सध्या 8 लाख 61 हजार 853 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनाने 1 लाख 9 हजार 150 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिली आहे.

मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 9 लाख 94 हजार 851 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशातील कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी 78 लाख 72 हजार 93 चाचण्या झाला असल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात कोरोनाचा प्रभाव जास्त दिसत आहे. या पाचही राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे या राज्यांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. 

यामध्ये सर्वात जास्त रिकव्हरी रेट आंध्रप्रदेशात(93 टक्के) आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात अनुक्रमे 82.8, 81.3, 65.4 आणि 91.7 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या सगळ्यात जास्त मृत्यूदर महाराष्ट्रात 2.6 टक्के आणि सर्वात कमी केरळात 0.4 टक्के आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT