update of corona 
देश

Corona Updates: देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 50 हजारांच्या पुढे

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: काही दिवसांपुर्वी कोरोनाचा देशातील प्रभाव उतरताना दिसला होता. प्रतिदिन कोरोना रुग्णांची वाढ 40 हजारांच्या आत आली होती. पण नंतर कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 50 हजार 209 रुग्णांचे निदान झालं असून 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या 83 लाख 64 हजार 86 वर गेली आहे. तर मृत्यूंचा आकडा 1 लाख 24 हजार 315 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात 77 लाख 11 हजार 809 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 55 हजार 331 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

रोजची देशातील चाचण्यांची संख्या वाढताना दिसत आहेत. यामुळे कोरोना रुग्ण शोधण्यास मदत होत आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाच्या 12 लाख 9 हजार 425 चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशातील कोरोना चाचण्यांची संख्या 11 कोटी 42 लाख 8 हजार 384 झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

देशात सध्या दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. युरोपातील कोरोनाची स्थितीही बिकट होत आहे. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. युरोपातील बऱ्याच देशांनी पुन्हा लॉकडाऊनही जाहीर केले आहे.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Relief: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारकडून ३३४.९८ कोटींच्या मदतीला मंजुरी, मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

T20 WC India Semifinal Scenario : द. आफ्रिकेच्या पोरींनी बाजी मारली, भारतीय संघाची झोप उडवली; उपांत्य फेरीत कोण पोहोचणार अन् कसे?

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर येईल 'ग्लो'! फॉलो करा या ५ सोप्या स्कीन केअर टिप्स

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप

Gokul Dairy Election BJP Kolhapur : गोकुळ दूध संघात मुश्रीफ वरचढ की महाडिक?, भाजप शक्तिप्रदर्शनाने ठराव करणार दाखल; महाडिक गटाकडून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT