sakal
देश

भारीच! आता व्हॉट्सअ‍ॅपवरही बुक करता येणार कोरोना लसीचं स्लॉट

या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व प्रौढ नागरिकांचे कोरोना लसीकरण पुर्ण व्हावे. यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्न करतांना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व प्रौढ नागरिकांचे कोरोना लसीकरण पुर्ण व्हावे. यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्न करतांना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सरकारने आजपासून कोरोना लसीकरणासाठी व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेण्याचं ठरवलं आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त प्रौढ नागरिकांना लसीकरणास मदत होणार आहे. कारण आजपासून व्हॉट्सअ‍ॅपवर सुद्धा कोरोना लसीसाठी नोंदणी करता येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी आज यासंबंधी ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की, 'नागरिक सुविधेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आता आपण आपल्या मोबाईलद्वारे कोरोना लसीचं स्लॉट बुक करू शकता.' असे ट्विट मंडाविया यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर कोरोना स्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला +919013151515 या क्रमांकावर 'Book Slot' असे मॅसेज पाठावे लागणार आहे. त्यानंतर एक ओटीपी येईल आणि क्रमांकाची सत्यापण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेला स्लॉट बुक करायचं आहे. त्यासंबंधी माहिती टाकावी लागणार आहे. त्यानंतर कोरोना स्लॉट बुक झाल्यांचे एक मॅसेज तुम्हाला प्राप्त होणार आहे.

दरम्यान देशात आतापर्यंत 58.8 कोटी जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत सुमारे 108 कोटी जणांना कोरोनाची लस मिळावी असा मुख्य उद्देश सरकारचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT