corona main.jpg 
देश

देशात पहिल्या टप्प्यात 3 कोटी कोरोना योद्धांना देणार लस, सरकारची तयारी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली-  भारतात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत आहे. याचदरम्यान सरकारही कोरोनाच्या लशीकरणाबाबत तयारीला लागले आहे. देशात कोरोनाची लस आल्यानंतर सर्वात आधी ती कोणाकोणाला द्यायची याची सरकारने तयारी केल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात देशात सर्वात आधी लस मिळवणारे 3 कोटी कोण असतील याची ब्ल्यू प्रिंट सरकारने तयार केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम कोरोना योद्ध्यांना म्हणजे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, कोरोना लस मिळवणाऱ्या 30 मिलियनमध्ये (3 कोटी) 7 मिलियन डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ आणि 20 मिलियन इतर कोरोना योद्ध्यांना लस दिली जाईल. देशात 3 कोटी लोकसंख्येला लस देण्याबाबत सरकारची योजना तयार आहे. आपल्याकडे शीतगृह, सिरिंज सर्वकाही तयार आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, देशात सध्या कोरोना लस उपलब्ध नाही. पुढील वर्षीच्या सुरुवातीला लस मिळू शकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जानेवारी आणि जून 2021 दरम्यान लशीकरणाचा तात्पुरता पहिला टप्पा निश्चित करण्यात आला आहे. 

काही खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे कोविड-19 लशीचा मोठ्याप्रमाणात साठा करणे आणि देखरेखीसाठी पायाभूत सुविधा असल्याचा दावा केला आहे. यावर आरोग्य सचिवांनी याबाबत सरकार खासगी संस्थांशी समन्वय साधत असल्याचे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT