कोरोना चाचणी 
देश

महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना केंद्राचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट संपत असतानाच तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नसतानाच महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळसह (Keral) १० राज्यांतील ४६ जिल्ह्यांत संसर्गाचा (Infection) दर १० टक्क्यांच्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणा (Health System) धास्तावली आहे. धोकादायक परिस्थिती पाहाता आयसीएमआरने देशातील 46 जिल्ह्यांना इशारा दिला असून निर्बंध अधिक कठोर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या 46 जिल्ह्यांमध्ये राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशातील ४६ जिल्ह्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त व अन्य ५३ जिल्ह्यांत तो ५ ते १० टक्के आहे. वेगाने वाढणारी रुग्णसंख्या पाहता केरळने दोन दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. महाराष्ट्रातील रूग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर येथेही हीच वेळ येण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे...

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अहमदनगर आणि बीड

दहा राज्य कोणती?

केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश व मणिपूर

दहा राज्यांकडून केंद्राला सूचना

रुग्णालये व तेथील सुविधा, ऑक्सिजन संयंत्रे व त्यांची देखभाल याबाबतची माहिती केंद्राकडे त्वरित कळवावी, असे सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट कार्यरत करण्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे कोरोनाग्रस्त गृह विलगीकरणात आहेत, त्यांनी कोणत्याही स्थितीत घराबाहेर पडून लोकांमध्ये मिसळू नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT