coronavirus mp nusrat jahan reaction delhis tbiligi tribes programe markaj  
देश

तबलिगी जमातीच्या कार्यक्रमावर नुसरत जहाँ संतापली...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशाने लॉकडाऊन केला आहे. मात्र, दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमानंतर टीएमसी खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ संतापली आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाली की, 'देशात अनेक धर्म आहे. मात्र, कोणत्याही धर्माने अशाप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. मरकज प्रकरणाने आपल्याला खूप मागे आणले आहे. हे कृत्य सहन करण्यापलीकडे आहे. कोणताही आजार धर्म, गरीब-श्रीमंत बघून हल्ला करत नाही. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आज देश ज्या संकटातून जात आहे अशावेळी आपल्याला राजकारण, धर्म आणि जातीबाबत बोलणे बंद केले पाहिजे. धर्म नंतर येईल पण सावधान राहणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आताची वेळ संवेदनशील आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, या कोरोना व्हायरसच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला घरातच राहून सुरक्षित राहायला लागेल.'

पोलिसाला सलाम; 450 किमी चालत कामावर हजर

दरम्यान, दिल्लीत लॉकडाऊन असूनही निजामुद्दीन येथील तबलिगी मरकजच्या कार्यक्रमात २ हजारांपेक्षा अधिक लोक एकत्र आले होते. यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. यातील ९०० जण महाराष्ट्रात परतले आहेत. तर ३३४ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ७०० जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठवले आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, किर्गिझस्तान यांच्यासह २,००० हून अधिक प्रतिनिधींनी निजामुद्दीन येथे असलेल्या मरकजमध्ये १ ते १५ मार्च दरम्यान धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण समोर आली आहेत. मरकजमधील २४ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमामुळे अनेक स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मौलाना साद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या मौलाना फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Latest Marathi News Live Update : भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांकडून आज चालवल्या जाणाऱ्या एकूण २८१ उड्डाणे रद्द

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT