देश

कोरोनाचा हाहा:कार; दिवसभरात 6 हजार 148 जणांचा मृत्यू

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरिही मृत्यूच्या आकडेवारीनं मात्र चिंता वाढवली आहे. मागील काही दिवासांत मृताची संख्याही कमी झाली होती. मात्र, गरुवारी कोरोनामुळे मृत्यूनं सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. गुरुवारी आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची नोंज झाली आहे. आरोग्य मंत्रालायनं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशात सहा हजार 148 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत 4 हजार 500 पर्यंत कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. मात्र गुरुवारी हा विक्रम मोडीत निघाला आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसातील आकडेवारी नोंदवली नव्हती. ती आकडेवारी बुधवारी अपडेट करण्यात आली.बुधवारी एकट्या बिहार राज्यात जवळपास 3 हजार 951 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. बिहारमध्ये अचानक वाढलेल्या मृताच्या संख्येमुळे देशातील कोरोना मृताचा विक्रम मोडीत निघाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशात 94 हजार 52 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. लागोपाठ तिसऱ्या दिवशी एक लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत एक लाख 51 हजार 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील सध्याची कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण (Total cases ) : 2,91,83,121

एकूण कोरोनामुक्त (Total discharges) : 2,76,55,493

एकूण मृत्यू (Death toll ) : 3,59,676

उपचाराधीन रुग्ण (Active cases ) : 11,67,952

एकूण लसीकरण (Total vaccination) : 23,90,58,360

देशातील 15 राज्यात पाच टक्क्यांहून जास्त संसर्ग दर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जर संसर्ग दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हणता येत नाही. भारतातील गोवा, केरळ, नागालँड, मेघायल, तामिळनाडु, सिक्कीम, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, मणिपूर, पुद्दुचेरी, मिझोराम, लक्षद्वीप आणि महाराष्ट्रात 5 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग दर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Latest Marathi News Live Update : बीडच्या ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला न्याय; आंदोलनानंतर कारखान्याकडून २१ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

SCROLL FOR NEXT