ANI
देश

132 दिवसानंतर देशात आढळले 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates: देशातील कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही स्थिर झालेली दिसत नाही. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. शनिवार-रविवारी कोरोना रुग्णांची संख्या 35 हजारांपेक्षा जास्त होती. सोमवारी यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात 29 हजार 689 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तब्बल 132 दिवसानंतर कोरोना रुग्णांची संख्या तीस हजारांच्या खाली आली आहे. मागील 24 तासांत तब्बल 42 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 415 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील 8 राज्यात कडक निर्बंध आहेत. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडु, मिझोराम, गोवा, पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. याठिकाणी आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध आहेत.

देशातील कोरोना स्थिती -

गेल्या 24 तासातील नवीन रुग्ण - 29,689

दिवसभरात कोरोनामुक्त झालेले - 42,363

मागील 24 तासांतील मृताची संख्या - 415

आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले - 3,06,21,469

सध्या उपचाराधीन असलेल्यांची संख्या - 3,98,100

कोरोनामुळे मृत्यू पावलेले - 4,21,382

आतापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले - 44,19,12,395

तब्बल 124 दिवसानंतर देशालील उपचाराधीन रुग्णांची संख्या चार लाखांच्या खाली आली आहे. देशात सध्या तीन लाख 98 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.39 टक्के इतका झाला आहे. सध्या देशातील 11 राज्यांमध्ये प्रत्येक दिवशी 500 हून जास्त रुग्ण सापडत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मणिपूर, मेघालय आणि मिझोरामचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT