coronavirus pm modi share small boyes video viral on social media 
देश

एक नंबर मुलांनो; मोदींनी केला व्हिडिओ शेअर...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, चिमुकल्यांनी त्याचे उत्तर एका मिनिटाच्या व्हिडिओमधून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांचा व्हिडिओ शेअर केला असून, तो चर्चेत आला आहे.

मुलांनी खेळत असताना त्या खेळातून कोरोना संदर्भात जनजागृती निर्माण करण्याचे काम केले आहे. साध्या सोप्या शब्दात कोरोना कसा पसरतो आणि ती साखळी तोडायची असेल तर काय करायला हवं? हे त्यांनी खेळाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. या मुलांवर नेटिझन्स शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटरवरून व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी पाहिला असून, प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रत्येक सेंकदाला पाहाणाऱयांबरोबरच रिट्विट व प्रतिक्रियांचा आकडा वाढत आहे. यावरूनच या व्हिडिओचा अंदाज येतो.

दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर त्या थोपवण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशात जवळपास 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात तीन हजार जणांना लागण झाली आहे. जगभरातील 180 हून अधिक देशांतील 2,083,237 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 34 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना जगभरात वेगाने वाढत असताना लहान मुलांनी त्यांचं साध सोप उत्तर दिले आहे.

बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी जमले तीन हजार नागरिक अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT