coronavirus update delhi health minister satendra jain found covid positive 
देश

धक्कादायक! राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोनाची लागण; उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारला कार्यभार

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली- दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाल्याचं बुधवारी स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जैन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाय यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळांच्या बैठकांना उपस्थिती लावली होती. त्यामुळे चिंता वाढली आहे. जैन यांच्या अनुपस्थितीमध्ये आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी मनीष सिसोदिया यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सत्येंद्र जैन बरे होऊन कामावर परतत नाहीत तोपर्यंत त्यांच्या सर्व विभागाचे काम उपमुख्यमंत्री सिसोदिया पाहणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्येंद्र जैन यांच्यात कोरोनासदृष्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांची कोविड-19 चाचणी घेण्यात आली. बुधवारी त्यांचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी घेण्यात येत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 44 हजारांच्या पार गेला आहे. अशात आरोग्य मंत्र्यांनाचा कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

- कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आतापर्यंत 44,688 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूने 1837 लोकांचा बळी घेतला आहे. तर 16 हजार 500 लोकांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. सध्या दिल्लीत 26 हजार 531 सक्रीय कोविड रुग्ण आहेत. दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने धोका वाढला आहे.  

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्यांही दिवसेंदिवस वाढत आहे, देशात 11 हजार 903 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी 2003 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 11 हजारांच्या जवळ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजारांच्या आसापास नोंदला जात आहे. त्यामुळे कोरोना महामारी भीषण रुप धारण करत असल्याचं दिसत आहे. समाधानाची बाब म्हणजे यातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तसेच रिकव्हरी रेट 53 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या देशात 1 लाख 55 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत 60 लाख 84 हजारांपेक्षाही जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- 'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT