Corona-Patient 
देश

देशात covid-19 रुग्णांची संख्या 1.51 लाखांपुढे; महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक

पीटीआय

दिल्ली - covid-19 मुळे जगभरात असामान्य आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी हा आकडा 1.51 झाला आहे. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोरोना महामारी भयंकर रुप धारण करत असल्याचं दिसत आहे. शिवाय सर्वाधिक बाधित 10 देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. त्यामुळे सरकारसमोरील चिंता वाढली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोमवारी देशातील कोरोना बाधितांचा आकडा 1,51,767 पर्यंत पोहोचला आहे, तर गेल्या चोवीस तासात 6,387 नव्या रुग्णांची यात भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या 6 हजाराच्या पुढेच नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. covid-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4337 झाली असून मंगळवारी 170 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी यातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 64,425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 41 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. 

देशात महाराष्ट्र राज्यातील स्थिती अत्यंत भयंकर बनली आहे. कारण मंगळवारी कोरोना बाधितांचा आकडा 54,758 पर्यंत पोहोचला आहे. रविवारी महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 3041 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसत आहे. सोमवारी 2,436 तर मंगळवारी 2019 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तसेच मंगळवारी 96 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आतापर्यंत एकदिवसातील सर्वाधिक आकडा ठरला असून एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 1792 झाली आहे.

जगभरात आतापर्यंत 56,78,026  लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर मृतांचा आकडा 3,51,668 झाला आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये तर कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत 18 लाख कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर मृतांचा आकडा 1 लाखांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे अमेरिका कोरोना महामारीपुढे पूर्णपणे हतबल झाल्याचं चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: Jio IPO की Reliance चे शेअर्स? तुमच्याकडे 14,000 रुपये असतील तर कुठे गुंतवणं फायद्याचं? तज्ज्ञ काय सांगतात

'मैं मुस्लिम हूं, लेकिन नमाज नहीं पढ़ती' अभिनेत्री शबाना आजमी म्हणाल्या, 'माशाअल्लाह' म्हटलं की, जावेद अख्तर चिडतात'

वयाच्या ३९ व्या वर्षीही अविवाहित का आहे ललित प्रभाकर? सांगितलं लग्न न करण्याचं कारण, म्हणाला- मला...

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करणार

IND vs NZ 1st T20I : खेळपट्टीत ट्विस्ट? वैभव सूर्यवंशीला Playing XI मध्ये खेळवण्याचा करावा लागेल विचार; गंभीर, अय्यर कठोर निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT