cowin 
देश

COVID: लस घेण्यासाठी Co-WIN App वर कसे कराल रजिस्ट्रेशन? जाणून घ्या प्रोसेस

सकाळन्यूजनेटवर्क

कोरोना लसीचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सोमवारपासून (1 मार्च) सुरु झाले आहे. या टप्प्यात 60 पेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. तुम्हालाही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्ही तीन पद्धतीने ते करु शकता. यात सेल्फ रजिस्ट्रेशन, ऑन-साईट रजिस्ट्रेशन आणि फॅसिलेटेड कोहोर्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस यांचा समावेश होतो. सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला  Cowin 2.0 App डाऊनलोड करावा लागेल. याशिवाय तुम्ही Arogya Setu आणि Co-WIN website (cowin.gov.in)वरुनही रेजिस्ट्रेशन करु शकता.  Co-WIN App वर कशाप्रकारे रेजिस्ट्रेशन करायचं जाणून घेऊया.

- तुम्हाला सर्वात आधी CoWin app डाऊनलोड करावा लागेल
-रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल, यावर तुम्हाला OTP येईल. तो टाकून व्हेरिफाय करा
- यानंतर तुम्ही लसीकरणाच्या पेजवर याल. यावर तुम्हाला फोटो आयडी प्रूफचा ऑप्शन निवडाला लागेल
-त्यानंतर तुम्हाला नाव, वय, लिंग टाकावा लागेल
-येथे तुम्हाला आयडेंटी प्रूफचे डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल
- संपूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर बटनवर क्लिक करु शकता. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आपल्या अकाऊंटवर डिटेल मिळून जातील
- तुम्ही एका मोबाईल क्रमांकावरुन तीन लोकांचे रजिस्ट्रेशन करु शकता
-यानंतर तुम्हाला Shedule Appointment  च्या ऑप्शनवर क्लिक करावा लागेल
- त्यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड टाकून लसीकरण सेंटर निवडू शकता
- त्यानंतर तुमच्यासमोर लसीकरणासाठी उपलब्ध असलेली तारिख दिसेल
- यानंतर तुम्हाला बुक बटनवर क्लिक करावं लागेल
-या सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला लसीकरण सेंटरच्या डिटेलचा मेसेज मिळेल
-वेळ निश्चित केली असली तरी तुम्ही याला रीशेड्यूल करु शकता, पण लसीकरणाच्या तारखेआधी तुम्हाला ते करावं लागेल

जर तुम्हाला Co-WIN App  डाऊनलोड करायचं नसेल तर cowin.gov.in या लिंकवर जाऊनही तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकता. त्याठिकाणीही तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करावी लागेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT