vaccination 
देश

45 वर्षांवरील व्यक्तींसाठी लस कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या सर्व काही 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी दिवसभरात 47 हजार 262 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 275 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम सुरु असून लवकरच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होणार आहे. देशातील पाच राज्यात एकूण कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रुग्ण आहेत. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम 1 एप्रिलला सुरु होणार आहे. यामध्ये 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना लस दिली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात आलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तरुणांनाही लस देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. पण केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की, नियमानुसार जे पात्र आहे त्यांनी नोंदणी करावी आणि लस घ्यावी. 

कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. यामध्ये दुसरा डोस 28 दिवसानंतर घेण्यासाठी ऑटो शेड्युल फिचर आहे. असं असलं तरीही लस घेणाऱे दुसरा डोस आठ आठवड्याच्या आत कधीही घेऊ शकतात. मात्र यापेक्षा जास्त वेळ घालवू नये असंही सांगण्यात आलं आहे. www.cowin.gov.in वर तुम्ही दुसऱ्या डोससाठी तारीख निवडू शकता.

  • तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. यामध्ये व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी 1977 च्या आधीचा असावा. 
  • लस घेण्यासाठी व्यक्तीला आजारी आहे किंवा नाही यासाठीच्या दाखल्याची गरद नाही. याबाबत असलेली अट काढून टाकण्यात आली आहे
  • कोविन अॅप रजिस्ट्रेशनची सिस्टिम 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी 1 एप्रिल 2021 पासून सुरु होईल. 
  • लशींचा पुरेसा साठा असून लोकांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.
  • लस घेतल्यानंतर त्याची पावती डिजिटल कॉपी किंवा व्हॅक्सिनेशन सर्टीफिकेटच्या लिंकची मागणी केली पाहिजे.
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुले खासगी रुग्णालयातही 24 तास कोरोना लस देण्याची सुविधा.
  • खासगी रुग्णालयांनी लसीच्या किंमतीमध्ये लस प्रमाणपत्रासाठी पैसे आकारले आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. तिथून निघण्यापूर्वी लस घेतल्याचं सर्टीफिकेट मागून घ्या. रुग्णालयाने देण्यास नकार दिला तर याची तक्रार 1075 या टोल फ्री क्रमांकावर करू शकता.

कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी केली असल्यास सरकारी किंवा खासगी रुग्णालयात पुन्हा अपॉइंटमेंटची गरज नाही. जर कोविन अॅप प्रमाणे एखाद्या रुग्णालयाने काम करण्यास नकार दिला तर त्याचीही तक्रार टोल फ्री क्रमांकावर करता येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT