jivithkumar 
देश

NEET 2020: परीक्षा क्रॅक केली पण फी कशी भरु? देशात अव्वल आलेल्या गुराख्याच्या मुलासमोर प्रश्न

प्रमोद सरवळे

थेनी: वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी असणारी परिक्षा NEET पास होऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणे हे बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्ससाठी असणाऱ्या NEET परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे या राष्ट्रीय पात्रता परिक्षेत देशातील सरकारी शाळांमधील मुलांनी चांगले यश मिळवल्याचे दिसून आले आहे.  

"परिस्थितीमुळे सुरुवातीला डॉक्टर बनणं हे ध्येय नव्हतं, पण मी परीक्षा क्रॅक करणं खूप कठीण असतं असं ऐकलं होतं म्हणून मी या परिक्षेसाठी जिद्दीने तयारी केली. आता मला एमबीबीएस करायचं आहे पण माझ्या कुटुंबाला सरकारी कॉलेजची फीही भरता येणार नाही. माझी सर्वांनी विनंती आहे की, मला माझा कोर्स करायला मदत करा." हे उद्गार NEET 2020च्या परिक्षेत 720 पैकी 664 गुण मिळवून देशातील सरकारी महाविद्यालयांमध्ये अव्वल ठरलेल्या जीवितकुमारचे या विद्यार्थ्याचे. 

देशातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये तामिळनाडूतील एका गुराख्याच्या मुलाने अव्वल स्थान मिळवले आहे. या विद्यार्थ्याचे नाव जीवितकुमार असून त्याचे वडील जीवनकुमार हे गुराखी असून ते मनरेगा मजूरही आहेत. जीवनकुमारांना एका बाजूला मुलाच्या यशाचं मोठं कौतूक आहे तर दुसऱ्या बाजूला हालाखीच्या आर्थिक स्थितीमुळे पुढील शिक्षण घेणं शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. हे कुटुंब तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील आहे. 

जीवितकुमार पेरियाकुलम जवळील सिल्व्हरपट्टी येथील गव्हर्नमेंट मॉडेल हायअर सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला शुक्रवारी NTAने जाहीर केलेल्या NEETच्या निकालात 720 पैकी 664 गुण मिळाले आहेत.

" सरकारी कॉलेजची फी भरणेही मला आणि माझ्या कुटुंबाला आवाक्याबाहेर आहे त्यामुळे मी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकणार नाही ." असं जिवितकुमार याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT