Credit Card Payment esakal
देश

Credit Card Payment : Credit Card वर लोकांनी 1.4 लाख कोटी रुपयांचा ब्रेड अन् बिस्कीटच खाल्ली, RBI चा धक्कादायक अहवाल!

छोट्या खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातोय?

Pooja Karande-Kadam

Credit Card Payment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्डवरील खर्च किंवा देय रक्कम गेल्या आर्थिक वर्षात एका श्रेणीत राहिली. भारतात UPI पेमेंटची व्याप्ती वाढत असली तरी अजूनही लोकांमध्ये क्रेडिट कार्डने खर्च करण्याची सवय दिसत नाही. 2023 मध्ये यामध्ये जोरदार तेजी आली आहे.

लोक रेशनच्या वस्तूंसाठी क्रेडिट कार्डद्वारे लहान पेमेंट देखील करतात. ज्यात, रोजचा किराणा माल, ब्रेड, बेकरी पदार्थ यांचा समावेश आहे. मे महिन्यात क्रेडिट कार्ड पेमेंटने नवा विक्रम निर्माण केला आहे. मे महिन्यात क्रेडिट कार्डचा खर्च विक्रमी १.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. (Reserve Bank Of India)

दुसरीकडे, रिझर्व्ह बँक सातत्याने बँकांना असुरक्षित कर्जे कमी करण्याचे आवाहन करत आहे. पण क्रेडिट कार्डकडे लोकांचा कल कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

छोट्या खर्चासाठी क्रेडिट कार्डचा वापर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्डवरील खर्च किंवा देय रक्कम गेल्या आर्थिक वर्षात एका श्रेणीत राहिली. यंदा त्यात मासिक आधारावर पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या वर्षी वापरात असलेल्या क्रेडिट कार्डांची संख्या जानेवारीपासून 50 लाखांहून अधिक वाढून मेमध्ये विक्रमी 8.74 कोटींवर पोहोचली आहे. नवीन कार्डांबद्दल बोलायचे तर, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत 20 लाख कार्ड वापरण्यात आले आहेत.

क्रेडीट कार्डांची संख्या वाढली

जानेवारी २०२३ मध्ये देशात ८.२४ कोटी सक्रिय क्रेडिट कार्डे होती. ही संख्या झपाट्याने वाढत असून फेब्रुवारीमध्ये 8.33 कोटी कार्ड, मार्चमध्ये 8.53 कोटी कार्ड, एप्रिलमध्ये 8.65 कोटी कार्डे झाली. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये संपूर्ण वर्षासाठी क्रेडिट कार्डवरील खर्च 1.1-1.2 लाख कोटी रुपये राहिला.

परंतु चालू आर्थिक वर्षात तो मे महिन्यात 1.4 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सेंट्रल बँकेने सांगितले की क्रेडिट कार्डवरील सरासरी खर्च देखील 16,144 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला आहे. (Credit Card)

या बँकेची जास्तीत जास्त क्रेडिट कार्डे

एचडीएफसी बँकेकडे मे महिन्यात सर्वाधिक १.८१ कोटी सक्रिय ठेवी होत्या. 28.5 टक्के शेअरसह क्रेडिट कार्ड थकबाकीच्या बाबतीत बँक अव्वल स्थानावर राहिली. दुसऱ्या क्रमांकावर 1.71 कोटी SBI कार्ड वापरात होते. यानंतर आयसीआयसीआय बँकेची १.४६ कोटी कार्ड वापरात होती. अॅक्सिस बँक 1.24 कोटी क्रेडिट कार्डांसह चौथ्या स्थानावर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT