yogi adityanath 
देश

उत्तर प्रदेशात महिलांची छेड काढली की आता थेट...

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यामध्ये कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत.

योगी सरकारने यापद्धतीचा निर्णय सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केला होता. सरकारी संपत्तीचे नुकासान करणाऱ्यांचे फोटो योगी सरकारने चौका चौकांमध्ये लावले होते. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महिलांची छेड काढणाऱ्यांचे छायाचित्रे लावण्याच्या पोलिसांच्या या मोहिमेला 'ऑपरेशन दुराचारी' असे नाव देण्यात आले आहे. या सर्व मोहिमेची जबाबदारी पोलिस खात्याकडे देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महिला पोलिस अधिकारी शहरांमधील प्रमुख ठिकाणी गस्त घालतील आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवर नजर ठेवतील. महिलांची छेड काढणाऱयांची आणि त्याला मदत करणाऱयांची छायाचित्रासह नावांचे पोस्टर शहरातील चौकाचौकात लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.'

दरम्यान, राज्यामध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, छेडछाड रोखण्यासाठी योगी सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही पोलिस स्थानकाच्या हद्दीत महिलांविरोधात एखादा गुन्हा घडला तर तेथील बीट इनचार्ज, पोलिस स्थानकातील प्रमुख अधिकारी आणि सर्कल ऑफिसर जबाबदार असतील. शिवाय, छेडछाडीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपींना मदत करणाऱ्यांची नावेही समोर आणली गेली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT