Cricket Crime News In Kanpur  esakal
देश

Crime News : क्लीन बोल्ड करणं जिवावर बेतलं; राग आलेल्या फलंदाजानं 14 वर्षाचा मुलाचा गळाच आवळला

अनिरुद्ध संकपाळ

Cricket Crime News : कानपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी एका क्रिकेट सामन्यात 17 वर्षाच्या मुलाने क्लीन बोल्ड झाल्यानंतर 14 वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. मिळालेल्या माहितीनुसार या 14 वर्षाच्या मुलाचा मैदानावरच मृत्यू झाला आहे. ही घटना राहती देरिया गावात घडली. या घटनेनंतर आरोपी आणि त्याचा भाऊ घटनास्थळावरून पळून गेले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट खेळत असताना 14 वर्षाच्या मुलाने 17 वर्षाच्या मुलाला क्लीन बोल्ड केल्यानंतर 17 वर्षाचा मुलगा नाराज झाला. त्याने खेळपट्टी सोडण्यास नकार दिला. यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली.

प्रकरण एवढं वाढलं की आरोपी मुलाने त्याच्या भावाला बोलवून घेत 14 वर्षाच्या मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर या दोघा आरोपींनी या मुलाचा गळा दाबण्यास सुरूवात केली.

दरम्यान, मैदानावर उपस्थित असलेल्या दुसऱ्या मुलांनी पीडित मुलाच्या घरच्यांना या भांडणाबाबत कळवले. त्यानंतर कुटुंबीय मैदानावर पोहचले आणि त्यांनी मुलाला घाटमपूर रूग्णालयात नेले. मात्र तेथे या मुलाला मृत घोषित करण्यात आले.

कुटुंबीय मुलाचा मृतदेह घेऊन घरी परतले. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील प्रमुख विक्रम सिंह हे गावात पोहचले. यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्तात मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला.

मात्र कुटुंबीयांनी पोलिसांना रोखले आणि वरिष्ठ पोलीस किंवा जिल्हा दंडाधिकारी यांना बोलवण्याची मागणी केली. याचबरोबर कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी दबाव टाकल्यानंतर कुटुंबीयांनी चार तासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास परवानगी दिली.

घातमपूर एसीपी दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, 'एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT