Ghaziabad Crime News esakal
देश

Crime News : पत्नीच्या प्रियकराचा पतीनं घोटला गळा, मृतदेहाचे 20 तुकडे करुन फेकून दिले कचऱ्यात

अक्षय आणि पूनमचं ​​अफेअर होतं, हे मुलीला कळल्यानंतर तीनं स्वत:ला भाजून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

चौकशीअंती मिलालकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याची झडती घेतली असता, तीन गोण्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले.

Ghaziabad Crime News : आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर एका ऑटोरिक्षा चालकानं (Autorickshaw Driver) त्याच्या मृतदेहाचे तब्बल 20 तुकडे केले, नंतर ते 4 गोण्यांत भरुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले.

शनिवारी सायंकाळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हा मृतदेह सापडला. गुरुवारी रात्री रिक्षाचालकानं प्रियकराची हत्या केली. गाझियाबाद पोलिसांनी (Ghaziabad Police) याप्रकरणी आरोपी रिक्षाचालक मिलाल प्रजापतीला अटक केलीये.

मिलाल, त्याची दुसरी पत्नी पूनम आणि चार मुलांसह आदर्श नगरमध्ये राहतात. त्यांचा भाचा अक्षय गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं पोलिसांत दिली. तो राजस्थानच्या कोटपुतली येथून इथं आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता, जी महिला भाचा आहे म्हणून सांगत आहे, तोच या महिलेचा प्रियकर असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी पती मिलालची चौकशी केली असता, त्यानं संपूर्ण हकीकत सांगितली.

अक्षय आणि पूनमचं ​​अफेअर होतं, हे मुलीला कळल्यानंतर तीनं स्वत:ला भाजून घेतलं. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आपल्या मुलीसोबत झालेल्या दुर्घटनेमुळं त्यानं अक्षयला संपवण्याचा कट रचला. पूनमला सांगून अक्षयला राजस्थानहून इथं बोलावलं. यानंतर रात्री पूनम आपल्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात गेली असता, पतीनं अक्षयचा गळा चिरून खून केला. यानंतर त्याच्या मृतदेहाचे 20 तुकडे करून चार गोण्यांमध्ये भरले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले.

चौकशीअंती मिलालकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याची झडती घेतली असता, तीन गोण्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले. धड व डोके असलेली गोणी सापडली नाहीत. यानंतर जेसीबीच्या साहाय्यानं चौथं पोतंही सापडलं. पोलिसांनी सर्व मृतदेह शवागारात पाठवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT