Delhi Crime News esakal
देश

Crime News : नात्याला काळिमा! एकाच कुटुंबातील वडील, 2 बहिणींसह आजीची मुलानं केली चाकूनं भोसकून हत्या

खून केल्यानंतर आरोपी मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तो घरातच मृतदेहाजवळ बसून राहिला.

सकाळ डिजिटल टीम

खून केल्यानंतर आरोपी मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तो घरातच मृतदेहाजवळ बसून राहिला.

Delhi Crime News : श्रध्दा वालकर हत्याकांडाचं (Shraddha Walker Murder Case) प्रकरण ताजं असतानाच आता देशाची राजधानी दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय. दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यातील पालम भागातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. राज नगर पार्ट-2 येथील एका घरात चार जणांचे मृतदेह आढळून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलानं वडील, दोन बहिणी आणि आजीची चाकूनं हत्या केलीय. मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार मुलावर हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी या मुलाला अटक केलीय.

मुलानं ही हत्या का केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. त्याचवेळी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडालीय. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, पालम भागातील एका घरात दोन बहिणी, त्यांचे वडील आणि आजीसह एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना घरातल्या मुलानंच घडवून आणली आहे.

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा अंमली पदार्थांचं व्यसन करत होता. काही दिवसांपूर्वीच तो व्यसनमुक्ती केंद्रातून परत आला आहे. घरात कशावरून तरी भांडण झालं, त्यानंतर त्यानं चौघांची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तो घरातच मृतदेहाजवळ बसून राहिला. सध्या त्याला अटक करून चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT