Nitin Gadkari  esakal
देश

Satellite Toll System: सध्याची टोल व्यवस्था रद्द! नितीन गडकरींचा मोठा निर्णय, वेळ अन् पैशांची होणार बचत

Nitin Gadkari announces end of toll booths: डिसेंबर २०२३ मध्ये, नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) चे लक्ष्य मार्च २०२४ पर्यंत या नव्या प्रणालीला लागू करण्याचे आहे, असे सांगितले होते.

Sandip Kapde

Satellite-based toll collection system in India

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेत सध्याच्या टोल व्यवस्थेला समाप्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी २६ जुलै रोजी सांगितले की सरकार सध्याची टोल व्यवस्था रद्द करत आहे आणि लवकरच सॅटेलाइट आधारित टोल संग्रह प्रणाली सुरु केली जाईल. या नव्या प्रणालीचा उद्देश टोल कलेक्शनला वाढवणे आणि टोल नाक्यावर होणारी गर्दी कमी करणे आहे.

राज्यसभेतील निवेदन-


राज्यसभेत एका लेखी उत्तरात नितीन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय जागतिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) लागू करणार आहे. ही प्रणाली सुरुवातीला काही निवडक टोल नाक्यावर वापरण्यात येईल.

यापूर्वी एएनआय या न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले होते, "आता आम्ही टोल समाप्त करत आहोत आणि सॅटेलाइट आधारित टोल संग्रह प्रणाली आणणार आहोत. तुमच्या बँक खात्यातून पैसे कटतील आणि तुम्ही जितकी अंतर पार कराल, त्यानुसार शुल्क आकारले जाईल. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल."


नवीन प्रणालीची माहिती-


डिसेंबर २०२३ मध्ये, नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) चे लक्ष्य मार्च २०२४ पर्यंत या नव्या प्रणालीला लागू करण्याचे आहे, असे सांगितले होते. टोल नाक्यावरीला प्रक्रियांना सुव्यवस्थित करणे आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल वर्ल्ड बँकेला सूचित करण्यात आले आहे. FASTag च्या सुरूवातीने टोल नाक्यावरील सरासरी प्रतीक्षा वेळ लक्षणीय कमी झाला आहे. कर्नाटकातील NH-275 च्या बंगळुरू-मैसूर विभागात आणि हरियाणातील NH-709 च्या पाणिपत-हिसार विभागात या प्रणालीचा यशस्वी वापर झाला आहे.

नवीन प्रणालीच्या फायद्यांविषयी-


नव्या सॅटेलाइट आधारित टोल कलेक्शन प्रणालीमुळे नागरिकांना बरेच फायदे मिळतील. या प्रणालीमुळे टोल प्लाझावर होणारी गर्दी कमी होईल, वाहनचालकांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुलभ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT