Cyclone Michaung
Cyclone Michaung  Esakal
देश

Cyclone Michaung: 'मिचाँग' चक्रीवादळ उद्या आंध्रला धडकणार; हवामान खात्याचा अंदाज, 'या' राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

अंकिता खाणे (Ankita Khane)

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे 'मिचाँग' या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ मंगळवारी (ता. ५) दुपारी नेल्लोर आणि मच्छलीपट्टणमदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास ९० ते १०० कि.मी. राहण्याचा अंदाज असून तो ११० कि.मी. पर्यंतही पोचू शकतो. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशबरोबरच दक्षिण ओडिशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ते तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात आंध्रला धडकण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. मात्र, चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील ३ ते ४ दिवसात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची (unseasonal Rain) शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही (Rain) पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Latest Marathi News)

मिचौंग चक्रीवादळामुळे केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील १२ जिल्हा प्रशासनसोबत बैठक घेत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी बैठक घेत आढावा घेतला आहे.

मिचौंग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशात भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. IMD कडून तामिळनाडूमधील उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळ माइचोंगबाबत अलर्ट जारी केला आहे.(Latest Marathi News)

या चक्रीवादळाला म्यानमारचे सुचविलेले 'मिचाँग

हे नाव दिले असून त्याचा अर्थ ताकद किंवा लवचिकता असा होतो. आज ते पुदुच्चेरीपासून ३०० कि.मी.वर आणि चेन्नईपासून ३१० कि.मी. तसेच नेल्लोरपासून ४४० कि.मी. व मच्छल्लीपट्टणमपासून ५५० कि.मी. वर होते.  (Marathi Tajya Batmya)

या चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते आणखी उत्तरेकडे सरकून पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला समांतर प्रवास करत मंगळवारी (ता.५) दुपारी ते नेल्लोर आणि मच्छलीपट्टणमदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या निवेदनात म्हटले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशावरही जाणवणार असून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT