रायपूर : छत्तीसगडमधल्या एका छोटाशा गावात सायकल दुरुस्ती करणाऱ्या वडिलांचं मुलीनं नाव उंचावलं आहे. रितीका ध्रूव असं तिचं नाव असून तिला थेट अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासात संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. महासमुन्द जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावर ती राहते. रितीकाचं कौतुक करण्यासाठी सध्या ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. (daughter of bicycle repairer got chance to Research at NASA)
रितीका महासमुंद जिल्ह्यातील नयापारा येथील आत्मानंद इंग्रजी महाविद्यालयात अकरावीत शिकते. नासा सिटीझन सायन्स प्रॉजेक्ट या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळणार आहे. यात भारतातील सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. लघुग्रहांचा शोध या विषयाकरता भारतातील सहा विद्यार्थी संशोधन करणार आहेत.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेन्ट सेंटरने लघुग्रह संशोधन उपक्रम सुरू केला आहे. रितीकाने व्हॅक्यूम क्लीनर या विषयावरील सादरीकरणाने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सतीश धवन स्पेस सेंटर,आंध्रप्रदेश येथील तज्ज्ञांवर छाप पाडली. लघुग्रह संशोधनाच्या अभिय़ानामध्ये तिने सहभाग नोंदवला होता, त्यातूनच तिची निवड झाली.
बालपणापासूनच रितीकाला अंतराळात घडणाऱ्या गोष्टींबाबत फार उत्कंठा होती. आठव्या इयत्तेत असताना तीने पहिल्यांदा अंतराळाबद्दलच्या प्रश्नोत्तर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आंतराळाशी संबंधित प्रत्येक उपक्रमांमध्ये ती सहभाग घ्यायला लागली. तिच्यासह आणखी पाच विद्यार्थ्यांची या संशोधनाकरता निवड करण्यात आली आहे.
श्रीहरीकोटा येथील आंतराळ संशोधन केंद्रामध्ये या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रितीकाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की, या सर्व विद्यार्थ्यांना सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये गुरूत्वाकर्षण शक्तीची अधिक माहीती मिळणार आहे. त्यासाठी ते श्रीहरीकोटा येथे निघाले असून सहा ऑक्टोबरपर्यंत त्यांचे प्रशिक्षण होणार आहे. रितीकाच्या आई-वडीलांसाठी, शिक्षकांसाठी तसेच संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या यशामुळे देशभरातून तिला कौतुकाची थाप मिळते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.