Nitin Gadkari Latest News Nitin Gadkari Latest News
देश

Airbags: ठरलं! 'या' तारखेपासून होणार 6 एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर भारतातील कार्समधील एअरबॅग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवाशी कारमध्ये सहा एअरबॅग्ज बंधनकारक करणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याची घोषणाही आचा त्यांनी केली आहे. त्यानुसार, पुढील वर्षी १ ऑक्टोबर २०२३ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. (Decided 6 airbags mandatory in cars from this date Nitin Gadkari announcement)

गडकरी म्हणाले, मोटार वाहनांची किंमत आणि प्रकार विचारात न घेता त्यातून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांची सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन 01 ऑक्टोबर 2023 पासून पॅसेंजर कार्समध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री याचं कार अपघातात निधन झालं. त्यांच्या मृत्यूचा सखोर तपास केल्यानंतर ही बाब समोर आली की त्यांची मर्सिडीज कार ही १०० किमी प्रतितासहून अधिक होता. तसेच त्यांच्या कारमध्ये चारमध्ये चार एअरबॅग्ज होत्या. ज्या प्रामुख्याने चालक आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करु शकतात. पण मागे बसलेल्या प्रवाशांची यामुळं सुरक्षा होत नाही. मिस्त्री यांच्या निधनानंतर भारतातील कारमधील एअरबॅग्जचा मुद्दा प्रकर्षानं चर्चचा गेला.

त्यानंतर केंद्रीय वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी याबाबत कार निर्मिती कंपन्यांना एअरबॅग्जबाबत थेट जाबच विचारला. कार निर्मिती कंपन्या परदेशात विकणाऱ्या कार्ससाठी आणि भारतात विकणाऱ्या कार्ससाठी वेगवेगळे सुरक्षा विषयक नियम अबलंबतात. यामध्ये एकाच कंपनीच्या एकाच मॉडेलच्या कारमध्ये भारतात चार तर परदेशात सहा एअरबॅग्ज असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT