deep sidhu main.png 
देश

मी तोंड उघडलं तर शेतकरी नेत्यांना पळता ही येणार नाही, दीप सिद्धूचा Facebook लाइव्हवरुन इशारा

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी जबाबदार ठरवला जात असलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धूने फेसबुकवर लाइव्ह येत शेतकरी नेत्यांना इशारा दिला आहे. वारंवार गद्दार म्हटले जात असल्यामुळे नाराज सिद्धूने शेतकरी नेत्यांना इशारा देताना म्हटले की, जर मी आतली गोष्ट सांगण्यास सुरुवात केली तर या नेत्यांना पळायला रस्ताही मिळणार नाही. हा माझा डायलॉग समजू नका. ही गोष्ट लक्षात ठेवा. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत. मानसिकता बदला.  

सिद्धूने म्हटले की, माझ्या बाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. मला काही स्पष्ट सांगण्याची वेळ आता आलेली आहे. दिल्लीत 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याबाबत तो म्हणाला की, युवकांना ट्रॅक्टर मार्चसाठी बोलावलं होतं. त्यानंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीतील ठरलेल्या मार्गावर परेड करण्याबाबत चर्चा केली. यावर युवकांनी रोष जाहीर केला तर शेतकरी नेत्यांनी यापासून अंतर राखले. 

शेतकरी नेते अहंकारी असून ते सरकारची भाषा बोलतात अशी टीका केली. शेतकऱ्यांनी एकता राखण्याचे आवाहन करत 26 जानेवारीची घटना स्मरणात ठेवण्याचे आवाहनही त्याने केले. शेतकरी नेत्यांनी याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे त्याने म्हटले. यावेळी तो वारंवार लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याबाबत बचाव केला. बाइकवर पळून जाण्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरही त्याने भाष्य केले. 

आम्ही लाल किल्ल्यातील कशाचेच नुकसान केलेले नाही. पोलिसांनी आम्हाला तुम्हाला जे काही करायचे ते करा. पण शांततेने करा आणि येथून जा, असे सांगितले. यावेळी सिद्धूने भाजप, आरएसएस आणि काँग्रेसबरोबरचे आपले संबंधही नाकारले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अदानींविरुद्धचा खटला मिटणार, अमेरिकन सरकारशी तडजोड; १,७२,७८,२०,००० रुपये दंड भरणार

Amravati: सुखी संसाराचं स्वप्न अन् सोबतीचा प्रवास चार महिन्यातच संपला! ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू

CET Student Accident : इंजिनियरींगचे स्वप्न, ‘सीईटी’साठी सोलापूरला गेला; स्वामींचे दर्शन घेऊन कोल्हापूरला येताना वडिलांसमोरच मुलगा ट्रकखाली चिरडला

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

SCROLL FOR NEXT