Police officials investigating the Delhi bomb blast after arresting Shaheen Shaheed from Faridabad for alleged links with Masood Azhar’s sister Shahida Azhar.

 

esakal

देश

Shaheen Shaheed Arrest : दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत नवीन खुलासा; मसूद अझहरच्या बहिणीच्या संपर्कात होती ‘शाहीन’

Masood Azhar’s Sister Connection with Shaheen Shaheed : भारतात महिला ब्रिगेड तयार करण्याचे सोपवण्यात आले होते काम; जाणून घ्या, अधिक माहिती

Mayur Ratnaparkhe

Shaheen Shaheed Arrested from Faridabad : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी आज एक मोठा खुलासा समोर आला आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे अटक करण्यात आलेली जैश-ए-मोहम्मदची महिला शाखेची प्रमुख डॉ. शाहीन हिच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. शाहीन ही लखनऊची रहिवासी आहे आणि अटक करण्यात आलेल्या दहशतवादी डॉ. मुझम्मिलची प्रेयसी देखील आहे. सोमवारी तिला फरिदाबाद येथे अटक करण्यात आली. तपासात असे दिसून आले की डॉ. शाहीन जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीण शाहिदा अझहर हिच्या संपर्कात होती.

याशिवाय,  तपासात असेही समोर आले की शाहीन ही शाहिदा अझहरच्या इशाऱ्यावर भारतात ‘जैश’साठी महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करत होती. ती जैशच्या जमात-उल-मोमिनत संघटनेशी संबंधित होती.

लखनऊची रहिवासी असणारी शाहीन ही फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात काम करते होती, अशी माहिती आहे. मुझम्मिलकडून मिळालेल्या माहितीवरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तिला फरिदाबादमध्ये अटक केली. तिनेच कारमध्ये एके-47 लपवण्याची परवानगी दिली होती. तपासात असे दिसून आले की ती देखील या दहशतवादी नेटवर्कचा भाग होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Record Break Voting : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात नोंदवला गेला मतदानाचा नवा रेकॉर्ड ; आता सर्वांनाच प्रतीक्षा निकालाची!

Ranji Trophy 4th Round: विदर्भाचा दणदणीत विजय; तर महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या मयंक अगरवालचं शतक अन्...

Latest Marathi Breaking News : नीलेश घायवळ टोळीला आणखी एक दणका, आता तिसरा 'मकोका' लावला

Mumbai Local: लोकल वाहतुकीला मिळणार ‘ग्रीन कॉरिडॉर’! 'या' मार्गादरम्यानचे १० रेल्वे फाटक होणार बंद

Ajit Pawar: रुपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेची ऑफर; उद्या घेणार अजित पवारांची भेट, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT