AAP MLAs arrive at Rajghat to pay tribute to Mahatma Gandhi esakal
देश

Arvind Kejriwal : बैठक संपातच सर्व आमदारांना घेऊन केजरीवाल पोहोचले राजघाटवर..

'आम्ही मरु, पण देशातील जनतेची फसवणूक कधी करणार नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'आम्ही मरु, पण देशातील जनतेची फसवणूक कधी करणार नाही.'

Aam Aadmi Party MLA Meeting Today Update : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी आप आमदारांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचे सर्व आमदार महात्मा गांधींचं (Mahatma Gandhi) स्मारक असलेल्या राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी स्मारकाला वंदन केलं.

'मागच्या जन्मी पुण्य केलं असेन, त्यामुळंच सिसोदियांसारखा जोडीदार मिळाला'

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचं कौतुक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी मागच्या जन्मात चांगली कामं केली असतील, त्यामुळं आज मला मनीष सिसोदियांसारखा जोडीदार मिळाला. त्यांनी भाजपची ऑफर धुडकावून लावली. आता ते आमच्या (आप) आमदारांना पैसे देऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर देत आहेत. मला माहिती मिळाली आहे की, भाजप प्रत्येक AAP आमदाराला 20 कोटी रुपयांमध्ये विकत घेत घेण्याचा प्रयत्न करत आहे.

केजरीवाल पुढं म्हणाले, "माझ्या एकाही आमदारानं त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही याचा मला आनंद आहे. मला दिल्लीतील जनतेला सांगायचं आहे की, तुम्ही एका प्रामाणिक पक्षाला मतदान केलंय. आम्ही मरु, पण देशातील जनतेची फसवणूक कधी करणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT