Delhi Crime News 
देश

Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली! 4 नराधमांनी अल्पवयीन मुलीला बळजबरीने उद्यानात नेलं अन्...

Sandip Kapde

Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली आहे. शाहबाद डेअरी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी उद्यानात चार नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून दोघांना अटक केली आहे. यासोबतच एका अल्पवयीन मुलालाही पकडण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री एक १६ वर्षीय मुलगी तिच्या मित्रासोबत घरी जात होती. यावेळी चार नराधमांनी तिची छेडछाड केली. यावेळी तिच्या मित्राने विरोध केला. मात्र नराधमांनी त्याला मारहाण केली तसेच पळून लावले. यानंतर चौघांनी मुलीला बळजबरीने उद्यानात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. (Crime News)

पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. या संदर्भात मुलीच्या वक्तव्याच्या आधारे पोलीस गँगरेप आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करत आहेत.

आरोपींची ओळख पटली असून अल्पवयीनासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बॉबी (१९) आणि राहुल (२०) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही शाहबाद डेअरी परिसरातील रहिवासी आहेत. या तिघांव्यतिरिक्त, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Delhi Crime News)

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, २७ जूनच्या रात्री पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये होती तेव्हा एका अल्पवयीन मुलासह काही मुले तेथे पोहोचली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पळून गेले. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तीन आरोपींना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT