set ablaze 
देश

कंपनीने मोबाईल बदलून देण्यास दिला नकार; स्वत:लाच घेतलं जाळून

सकाळवृत्तसेवा

दिल्ली : एका मोबाईल फोन कंपनीने खराब मोबाईल हँडसेट बदलून द्यायला नकार दिल्यामुळे एका व्यक्तीने स्वत:लाच जाळून घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना काल शुक्रवारी दिल्लीमध्ये घडली आहे. या व्यक्तीचे नाव भीमसिंह असे आहे. सध्या त्यांची अवस्था स्थिर आहे, असं कुटुंबियांनी सांगितलं आहे. याबाबतचा अधिक तपास दिल्लीमधील दक्षिण रोहीनी पोलिस स्टेशनमध्ये होत आहे. भीमसिंह हे प्रल्हादपूर गावाचे रहिवासी आहेत सध्या त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा - नव्या संसदेचे भारतीय पद्धतीचे सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद
आपल्या भाचीला या चाळीस वर्षीय व्यक्तीने नवा मोबाईल घेऊन दिला होता. तो 16 हजार रुपयांचा होता. मात्र, तो खराब निघाल्यामुळे तो बदलून द्यावा, यासाठी संबंधित व्यक्तीने मागणी केली होती. मात्र, दुकानदाराने यास नकार दिल्यामुळे भीमसिंह यांनी स्वत:लाच जाळून घेतले. इतक्या महागाचा मोबाईल खराब होत असेल तर संबंधित कंपनीने तो बदलून द्यायला हवा अशी भीमसिंह यांची मागणी आहे. 


भीमसिंह यांनी पोलिसांना सांगितलं की जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांनी प्रल्हादपूरमधील आपल्या घराजवळील एका दुकानातून मोबाईल खरेदी केला होता. त्यांनी आपल्या भाचीला हा मोबाईल भेट दिला होता. जेणेकरुन तिला आपल्या शाळेतील ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहता येईल. काही दिवसांतच या फोनने काम करणं बंद केलं आणि तो फुटला. त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी मोबाईल कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला फोन बदलून देण्याची मागणी केली. मात्र, कंपनीने आपल्याला धोरणांचा हवाला देत फोन बदलून देण्यास नकार दिला. त्यांनी पुन्हा मेल पाठवला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. 

हेही वाचा - देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू
काल शुक्रवारी दुपारी साधारण 12 वाजता रोहीणी भागातील सर्व्हीस सेंटरला गेले. तिथे त्या सेंटरमधील स्टाफला त्यांनी विनंती केली. मात्र, त्यांचं ऐकण्यात आलं नाही. म्हणून त्यांनी स्वत:वर पेट्रोल ओतून आग लावून घेतली. जवळील लोक लगेचच त्यांना वाचवण्यासाठी धावले. आणि त्यांना दवाखान्यात नेलं गेलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Drought Tweet : यंदा पावसाने दगा दिला; एकनाथ शिंदे यांचे ट्वीट चर्चेत, नेमकं काय म्हणाले शिंदे

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Ratnagiri Water Shortage: रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली; नगरपालिका सभेत दुष्काळसदृश स्थितीमुळे टंचाईवर चर्चा

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

Sunil Tatkare: खासदार सुनील तटकरेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका; काही तासांत सूत्रे फिरली; खेडमधील २.५ कोटींच्या कामांना वर्कऑर्डर

SCROLL FOR NEXT