Corona Test
Corona Test sakal
देश

दिल्लीत कोरोनाचा कहर! 4099 नवे रुग्ण; सहा दिवसांत आठपट रुग्णवाढ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा (Corona) कहर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो आहे. दिल्लीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये आता झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाचे नवे 4099 रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या शनिवारी-रविवारी देखील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. (Delhi)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका दिवसामध्ये 63477 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6.46 टक्के नमुने कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलंय. या दरम्यान 4099 लोक संक्रमित झाले असून 1509 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिल्लीमध्ये सध्या 10986 रुग्ण ऍक्टीव्ह असून पॉझिटीव्हीटी रेट 6.46 टक्के आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये दैनंदिन रुग्ण आठपट वाढले आहेत. 28 डिसेंबर रोजी फक्त 496 रुग्ण होते.

दोन दिवसांतील चाचण्यांत 84 टक्के ओमिक्रॉनबाधित

दिल्लीमध्ये कोरोनाच्या सापडलेल्या रुग्णांपैकी 84 टक्के नवे रुग्ण हे अत्यंत संसर्गजन्य मानल्या जाणाऱ्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने बाधित असल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. 30 आणि 31 डिसेंबर या दोन दिवसांतील चाचण्यांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट्समधून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या दोन दिवसांतील नमुन्यांपैकी 84 टक्के रिपोर्ट्स हे ओमिक्रॉन बाधित असल्याचं आढळून आलंय.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendar Jain) यांनी ही माहिती दिली आहे. सध्या देशातील जवळपास 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन विषाणू पसरला आहे. या 23 राज्यांपैकी महाराष्ट्र हेच राज्य सर्वांत अधिक संक्रमित राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात सध्या 510 ओमिक्रॉनबाधित रुग्ण असून त्याखालोखाल 351 रुग्ण हे दिल्लीमध्ये सापडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT