Police investigation reveals that the Delhi student’s acid attack case was fabricated, exposing a shocking twist in the story.

 

Sakal

देश

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

Delhi fake acid attack case : पीडितेच्या वडिलांनी केलं कबूल ; खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचण्यात आला

Mayur Ratnaparkhe

Delhi Acid Attack Case Turns Out to Be Fake: दिल्लीमध्ये एका विद्यार्थिनीवर भरदिवसा ॲसिड हल्ल्या झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सर्वस्तरातून संताप व्यक्त होत होता. मात्र आता हे प्रकरणं पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी वडिलांनी तीन पुरुषांना अडकवण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. 

घटनेच्यावेळी आरोपी दिल्लीत नव्हते, मुलीच्या वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. तिचा भाऊ अजूनही फरार आहे. भावाने त्याच्या बहिणीला अॅसिड हल्ल्याची कहाणी रचण्यास मदत केली होती. तिने आरोप केलेल्या तिघांच्या कुटुंबियींचा सध्या मुलीच्या वडिलांशी वाद सुरू आहे.

पोलिसांनी ॲसिड हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा असे आढळून आले की विद्यार्थिनी तिच्या भावासोबत मोटारसायकलवरून मुकुंदपूर येथील तिच्या घरातून निघाली होती. तिच्या भावाने तिला अशोक विहार येथे सोडले आणि त्यानंतर ती ई-रिक्षाने निघाली. मुलीचा भाऊही घटनेपासून फरार आहे.

 खरं तर, विद्यार्थिनीने आरोपींबद्दल सविस्तरपणे सर्व माहिती दिल्यानंतरच दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा संशय आला. पीडितेने मोटारसायकलचा नंबर, समोर, मागे आणि मधल्या जागी कोण बसले होते हे सांगितले आणि तिला अ‍ॅसिडची बाटली कोणी पकडली होती, ती कोणाला दिली होती आणि कोणी फेकली होती हे देखील तिला माहिती होते.

पोलिस सूत्रांनुसार, अ‍ॅसिड पीडितांना त्यांच्या हल्लेखोरांबद्दल इतकी तपशीलवार माहिती असण्याची शक्यता कमी आहे. तथापि, जेव्हा विद्यार्थ्याने सर्व तपशील पोलिसांना सांगितले तेव्हा त्यांना संशय आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT