Interfaith Marriage 
देश

आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना दिल्ली सरकार पुरवणार सुरक्षितता; SOP जाहीर

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या त्रासापासून आणि धमक्यांपासून वाचवण्यासाठी Standard Operating Procedure (SOP) जाहीर केले आहेत. तसेच अशा प्रकरणांच्या संरक्षणासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एक स्पेशल सेलची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. या SOP नुसार, ज्या जोडप्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून, स्थानिक समुदायाकडून अथवा जात पंचायतींकडून त्रास दिला जात आहे, त्यांना सरकार आपल्या 'सेफ हाऊस' अर्थात सुरक्षित गृहांमध्ये रहायला जागा देईल. 

टोल फ्री नंबर जाहीर
अशा जोडप्यांच्या मदतीसाठी 24 तास सेवा देणाऱ्या टोल फ्री नंबरची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सरकारने म्हटलंय की, दिल्ली महिला आयोगाच्या सध्याच्या टोल फ्री महिला हेल्पलाईन 181 वरच आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेले जोडपे त्रासाबद्दल अथवा धमकींबद्दल तक्रार दाखल करु शकतात. त्यांना नक्कीच इथून मदत मिळू शकेल. समाज कल्याण विभागाकडून जाहीर केलेल्या SOP मध्ये म्हटलंय की, टेलीकॉलरला आपला त्रास आणि तक्रार सांगणाऱ्या जोडप्यांना विनासायास मदत मिळावी यासाठी प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती केली गेली आहे. त्यांना आवश्यक ती मदत अथवा सल्ला दिला जाईल. यामध्ये पुढे म्हटलंय की, अशा जोडप्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर संबंधित भागातील पोलिस उपायुक्त या प्रकरणात लक्ष घालतील. तसेच ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित घरांमध्ये राहण्यासाठी त्यांची मदत केली जाईल. या गेल्या आठवड्याच्या सुरवातीलाच, आंतरजातीय विवाह केल्यामुळे दक्षिण-पूर्व दिल्लीच्या हरिजन वस्तीमध्ये हिंसा भडकली होती. दिल्ली पोलिसांनी या घटनेसंदर्भात अनेक लोकांना अटक केली आहे. 

जोडप्यांना पुरवली जाईल सुरक्षितता
अशा जोडप्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवली जाईल. तसेच 'सुरक्षित गृहांची' त्यांना गरज असल्यास ती व्यवस्था देखील त्यांना पुरवली जाईल. अशा जोडप्यांच्या मदतीसाठी संबंधित भागातील उपायुक्त त्यांच्यासाठी उपलब्ध असतील, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT