Delhi High Court Sakal
देश

दिल्ली हायकोर्टाने वैवाहिक बलात्कार याचिकांवरील निकाल ठेवला राखून

या प्रकरणात भारताला अत्यंत सावधपणे पुढे जावे लागणार आहे, असे, केंद्राने व्यक्त केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) वैवाहिक बलात्कार गुन्हा ठरविणाऱ्या याचिकांवरील निकाल राखून ठेवला आहे. भारतातील साक्षरता, आर्थिक दुर्बलता, महिला सक्षमीकरणाचा अभाव, गरिबी अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे भारताने या प्रकरणात अत्यंत सावधपणे पुढे जावे, असे मत केंद्र सरकारचे या प्रकरणावर व्यक्त केले आहे. (Criminalisation Of Marital Rape.)

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांमध्ये वैवाहिक बलात्कार (Rape) गुन्हा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यावर कलम ३७६ अंतर्गत आरोपींना शिक्षा करण्याच्या अनेक तरतुदी असल्याचे केंद्राचे मत आहे. यामध्ये दुखापतीच्या खुणा, मारहाण, शरीराच्या एखाद्या भागाला बळजबरीने स्पर्श करणे आदींचा समावेश आहे. परंतु वैवाहिक बलात्कारात या पुराव्यांची पुष्टी करणे कठीण असल्याचे केंद्राचे मत आहे.

या प्रकरणी केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, कोणत्याही कायद्यानुसार वैवाहिक बलात्काराची व्याख्या केलेली नाही. तर कलम ३७५ अंतर्गत बलात्काराची व्याख्या करण्यात आली आहे. त्यामुळे अशा घटना गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी व्यापक आधाराची आवश्यक असल्याचे केंद्राने दिलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यासाठी समाजाचे एकमत होणे आवश्यक आहे. याशिवाय वैवाहिक बलात्कार म्हणजे काय? हे देखील सांगणे गरजेचे आहे. भारतात साक्षरता, आर्थिक दुर्बलता, महिला सक्षमीकरणाचा अभाव, गरिबी अशी अनेक कारणे आहेत, त्यामुळे या प्रकरणात भारताला अत्यंत सावधपणे पुढे जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Latest Marathi News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार अन् पिकअपची धडक

Alandi Property Tax: आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; उद्या नगरपरिषदेत दिवसभर सुनावणी

SCROLL FOR NEXT