नवी दिल्ली - अनाज मंडी येथील कारखान्याला रविवारी लागलेल्या आगीत आप्तजन मृत्युमुखी पडल्याने नातेवाईक सुन्न झाले होते.
नवी दिल्ली - अनाज मंडी येथील कारखान्याला रविवारी लागलेल्या आगीत आप्तजन मृत्युमुखी पडल्याने नातेवाईक सुन्न झाले होते. 
देश

अग्नितांडव; दिल्लीत ४३ कामगारांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - दिल्लीत अनाज मंडी परिसरातील एका कारखान्याला रविवारी पहाटे भीषण आग लागली. यात ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जखमी झाले. मृत व्यक्तींतील बहुतांश जण बिहारचे मजूर आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने वेगाने हालचाली करीत ६३ जणांना वाचविले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि भरवस्तीतील अनाज मंडी भागात स्कूलबॅग, हॅंडबॅग तयार करण्याचा कारखाना असून, तो बेकायदा आहे. याच इमारतीच्या खालच्या मजल्यावर बेकरीदेखील असल्याचे समजते. हॅंडबॅग कारखान्यात काम करणारे जवळपास सर्वच जण स्थलांतरित मजूर विशेषत: बिहारचे होते. मात्र आज पहाटे या कारखान्याला अचानक आग लागली.

बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारच्या दोन इमारतीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीचे स्वरूप एवढे अक्राळविक्राळ होते, की अनेकांना बचावाची संधीच मिळाली नाही. आग लागली तेव्हा आत असलेले सर्वच मजूर गाढ झोपेत होते. कारखान्यात आणि इमारतीत अग्निशमनाची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश जण गुदमरून मृत्युमुखी पडले. या आगीत सर्व काही खाक झाल्याने घटनास्थळावर हृदयद्रावक दृश्‍य होते. या आगीची माहिती कळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अरुंद गल्ल्यांमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. कामगारांचे नातेवाईक, तसेच आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखान्याच्या ठिकाणी, तसेच आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये आपल्या प्रियजनांना शोधण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू होती. राम मनोहर लोहिया रुग्णालय, लोकनारायण जयप्रकाश रुग्णालय, वाडा हिंदूराव रुग्णालयात जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. एकट्या लोकनारायण जयप्रकाश रुग्णालयात ३४ मृतदेह नेण्यात आले होते. डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार धुरामुळे श्‍वास कोंडल्याने बऱ्याच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. 

दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. दिल्ली भाजपने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दुर्घटनेमागील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी घोषणा केली. तसेच, या गंभीर घटनेचे कारण अद्याप कळले नसून मंत्री इम्रान हुसेन यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना घडलेल्या या अग्निकांडामुळे राजकीय वातावरणदेखील तापले आहे. दिल्ली विधानसभेतील भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचीही मागणी केली. तर, भाजप खासदार व माजी मंत्री विजय गोयल यांनी या दुर्घटनेची जबाबदारी दिल्ली सरकारची असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीमध्ये अशा आगीच्या घटना नेहमीच्या झाल्या असून केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांच्या मतदारसंघात ही घटना घडली असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

    दिल्लीतील अनाज मंडीत कारखान्याला भीषण आग
    बहुतांश मृत बिहारचे
    फायर क्‍लीअरन्स नव्हते
    गुदमरल्याने अनेकांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाइकांना केंद्र, राज्याची मदत
अनाज मंडीतील दुर्घटनेमुळे काही वर्षांपूर्वीच्या उपहार सिनेमागृह अग्निकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची, तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली; तसेच मोफत उपचारांचीही घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अग्निकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली. तसेच मृतांतील बहुतांश कामगार बिहारचे असल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही मदत केली आहे.

दोघांना अटक
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात असले, तरी इमारतीच्या तळमजल्यावर विजेचे मीटर सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अन्य काही कारण असावे, असे वीज वितरण करणाऱ्या बीवायपीएलचे म्हणणे आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी कारखान्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मालक रेहान आणि व्यवस्थापक फरकान यांना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT