Aap Transgender Candidate Bobby Kinnar esakal
देश

Delhi MCD Election Result : 'आप'च्या ट्रान्सजेंडर उमेदवारानं काँग्रेस उमेदवाराचा तब्बल 'इतक्या' मतांनी केला पराभव

MCD मध्ये पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर समुदायाचा सदस्य एखाद्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आम आदमी पार्टी (Aap) आणि भाजप (BJP) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

AAP Transgender Candidate Win : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आम आदमी पार्टी (Aap) आणि भाजप (BJP) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या ट्रान्सजेंडर उमेदवार बॉबी किन्नर सुलतानपुरी ए वॉर्ड-43 मधून विजयी झाल्या आहेत. MCD मध्ये पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर समुदायाचा सदस्य एखाद्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे.

राज्य निवडणूक आयोगानं बॉबी किन्नर यांच्या विजयाला दुजोरा दिला आहे. बॉबी किन्नर यांनी काँग्रेस उमेदवार वरुण ढाका यांचा 6,714 मतांनी पराभव केला. यापूर्वी बॉबी म्हणाल्या होत्या, 'दिल्ली महानगरपालिकेतून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी मी काम करणार आहे. याशिवाय, माझा प्रभाग स्वच्छ, सुंदर कसा करता येईल यावर मी भर देणार आहे.'

कोण आहेत आप नेत्या बॉबी किन्नर?

38 वर्षीय बॉबी किन्नर यांना आम आदमी पक्षानं सुलतानपुरी माजरा विधानसभा मतदारसंघातून सुलतानपुरी-ए प्रभाग-43 मधून तिकीट दिलं आहे. अण्णांच्या आंदोलनापासूनच बॉबी किन्नर आप नेत्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं. बॉबी ह्या समाजसेवेचं देखील काम करत असतात.

बॉबी किन्नर यांनी स्वखर्चानं केली 15 मुलींची लग्नं

बॉबी किन्नर यांनी आतापर्यंत 15 मुलींची स्वखर्चानं लग्न केली आहेत. बॉबी किन्नर ह्या हिंदू युवा समाज एकता अवाम दहशतवाद विरोधी समितीच्या दिल्ली युनिटच्या अध्यक्ष देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT