Delhi Police Arrested Main conspirator
Delhi Police Arrested Main conspirator google
देश

Bulli Bai : मुख्य सुत्रधाराला आसामवरून अटक

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बुल्ली बाई अॅपवरून (Bulli Bai App) मुस्लीम महिलांची बदनामी केली जात होती. तसेच त्यांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करून त्यांचा लिलाव केला जात होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तिघांना (Mumbai Police Probe Bulli Bai Case) अटक केली आहे. आता दिल्ली पोलिसांनी याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.

मुख्य सूत्रधार आसामचा असून दिल्ली पोलिसांच्या IFSO स्पेशल सेलने आसाममधून त्याला अटक केली. निरज बिष्नोई असं या आरोपीचं नाव असून त्याने GitHub वर बुल्ली बाई अॅप तयार केले होते. तसेच बुल्ली बाई अॅपचं मुख्य ट्विटर अकाऊंट हा आरोपी हाताळत होता. त्याला अटक केली असून दिल्लीला आणले जात आहे, असं पोलिस अधिकारी के. पी. एस. मल्होत्रा यांनी सांगितले.

बुल्ली बाई अॅपवरून मुस्लीम महिलांच्या फोटोंचा लिलाव करण्यात येत होता. त्यानंतर शिवसेनेच्या प्रियंका चुतर्वेदी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू करून बंगळुरू आणि उत्तराखंडवरून तीन आरोपींना अटक केली. यामध्ये बंगळुरूवरून इंजिनिअरींगच्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली, तर उत्तराखंडवरून १८ वर्षीय तरुणी आणि आणखी एकाला ताब्यात घेतलं होतं. तसेच या प्रकरणाचं नेपाळ कनेक्शन असल्याचं देखील समोर आलं आहे.

...अन् दिल्ली पोलिसांनी केली कारवाईला सुरुवात -

बुल्ली बाई प्रकरणापूर्वी सुल्ली डिल्सवरून देखील असाच प्रकार सुरू होता. यावेळी दिल्ली महिला आयोगानं पोलिसांत तक्रार करून देखील त्यांनी कारवाई केली नव्हती. त्यानंतर बुल्ली बाई प्रकरण समोर आले. यावेळी देखील महिला आयोगानं तक्रार केली. तसेच पोलिसांना समन्स बजावून सुनावलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली असून आज मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT