दिल्ली पोलीसांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या कार चोराला पकडत एक नवा विक्रम गाठला आहे. देशातील सगळ्यात मोठा कार चोर अनिल चौहानला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. या चोराने आतापर्यंत पाच हजारपेक्षाही जास्त कार चोरल्या आहेत. शिवाय त्याच्यावर हत्या आणि घुसखोरीचेही आरोप आहेत. (Delhi Police arrested biggest thief who stolen near about 5 thound cars)
सेंट्रल दिल्ली पोलीसांच्या स्पेशल टीमने अनिल चौहान या चोरास आसाममध्ये अटक केली आहे. माहितीनुसार अनिल मागल्या २७ वर्षांपासून गुन्हेगारी आणि चोरी, घुसखोरी करतोय. १९९० मध्ये सगळ्यात जास्त मारुती कार चोरी झाल्या होत्या. तब्बल ८०० मारुती कारची चोरी त्यावेळी झाली होती. अनिल या कार्स जम्मू कश्मीर, नेपाळ आणि उत्तर पूर्व राज्यांमध्ये विकायचा.
अनिल चौहान आसाम सरकारमधला सगळ्यात मोठा ए क्लास कॉन्ट्रॅक्टर होता. ईडीच्या कार्यवाहीनंतर त्याच्याविरूगद्ध कार्यवाही करून त्याची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली होती. अटकेनंतर पोलीसांनी त्याच्याजवळून ६ पिस्टल, ७ कारतूस आणि चोरीची एक बाईक व कार जप्त केली आहे.
१९९० च्या काळात ऑटो रिक्शा चालवणारा अनिल नंतर गुन्हेगारीच्या दुनियेतील मोठा बादशाहाच झाला. त्याने बिनधास्त कार चोरीला सुरूवात केली. सात वर्षाआधीही या चोराला आसाम पोलीसांनी पकडले होते. त्याचं कार चोरीचं नेटवर्क दिल्लीपासून पसरत थेट आसाम ते महाराष्ट्रारात जाऊन पोहोचलं होतं. अनेक राज्यांत अनिलवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांच्या तपासानंतर अनिलने तब्बल ४५५२ कार चोरी केल्याचे कबुल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.