delhi police woman shot dead one sided love story 
देश

पोलिस खात्यातील एकतर्फी प्रेमाचा करूण अंत; तरुणीची हत्या करून त्याची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीत पोलिस दलातील एकतर्फीप्रेमाचा दुदैवी शेवट झाला आहे. लग्नाचं प्रपोजल नाकारलेल्या पोलिस उपनिरीक्षक तरुणीचा गोळ्या झाडून खून करत, पोलिस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात पोलिस तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

काय घडले?
या संदर्भात दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्लीतील रोहिणी परिसरातील मेट्रो स्टेशन वरून घरी जात असताना प्रिती अहलावत हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री साडे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रितीच्याच 2018च्या बॅचचा पोलिस उपनिरीक्षक दीपांशू राठी याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, दीपांशूने सोनीपत येथे मृथलमध्ये जाऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तेथे गाडीत दीपांशूचा मृतदेह सापडला आहे.

लग्नाचे प्रपोजल धुडकावले
दीपांशू आणि प्रिती एकाच पोलिस बॅचच होते. दीपांशू प्रितीवर प्रेम करत होता. त्याने तिला लग्नासाठी प्रपोजही केले होते. पण तिने नकार दिला. एकतर्फी प्रेमातून अस्वस्थ झालेल्या दीपांशूने काल टोकाचे पाऊल उचलले. दीपांशूनं केलेल्या गोळीबारात प्रितीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना तीन काडतुसं सापडली आहेत. तसेच पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याची माहिती पोलिस अधिकारी एसडी मिश्रा यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतरही उमेदवार जाहीर, आता माघारीसाठी काँग्रेसनं ठेवलीय अट

Akola News: अकोट ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत अवैध दारू विक्रीवर मोठा हल्ला; लाखभर मुद्देमाल जप्त

Akola News: राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात; ओव्हरलोड ट्रकची उभ्या ट्रकला धडक; दोन चालक गंभीर जखमी

Akola News: मुख्य बाजारपेठेला अतिक्रमणाचा विळखा; गल्लीबोळांतही बिनधास्त अतिक्रमण ;प्रशासन विभाग सुस्त

Akola News: आरटीओ विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिक हैराण; परवाना मिळेनाः एचएसआरपी नंबर प्लेटसाठी विलंब

SCROLL FOR NEXT