Delhi Reserves Hospitals For Residents Opens Borders From Tomorrow 
देश

दिल्लीतील रुग्णालये केवळ दिल्लीकरांसाठीच आरक्षित; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील रुग्णालयं केवळ दिल्लीकरांसाठीच आरक्षित राहणार आहेत. तसा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. दिल्लीतील रुग्णालयांत केवळ दिल्लीकरांवरच उपचार केले जातील. हरियाणा, उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यातील नागरिकांवर दिल्लीत उपचार केले जाणार नसल्याचे दिल्ली सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्र सरकारची रुग्णालयं यादरम्यान सर्वांसाठी खुली राहणार आहेत असे स्पष्ट केले आहे. हरियाणा आणि युपीच्या सीमा दिल्लीला चिटकून आहेत. आणि त्या दिल्लीसाठी उद्यापासून म्हणजेच ०८ तारखेपासून खुल्या करण्यात येणार आहेत, त्यामुळे दिल्लीतील रुग्णांलयांमध्ये मोठ्या प्रमाणात येथून रुग्ण येतात. त्यामुळे दिल्लीकरांसाठी बेड उपलब्ध होणार नसल्याची भिती दिल्ली सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीतील सर्व बेड हे दिल्लीकरांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. इतर राज्यातील नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत राज्यसरकारच्या रुग्णालयात ॲडमिट करुन घेतलं जाणार नाही. 


-----------
जी सेव्हनवरून चीनचा भारताला इशारा; अमेरिकेचा हा डाव असल्याचे मत
-----------
पुजारी करतायेत सॅनिटायझर वापरायला विरोध; कारण, वाचून व्हाल चकित
------------
इतर राज्यातील रुग्णांना परवानगी दिली तर ३ दिवसात सर्व बेड भरुन जातील असा सल्ला पाच तज्ञांच्या समितीने केजरीवाल सरकारला दिला होता. सध्या दिल्ली सरकारकडे १० हजार बेड्स आहेत. जून अखेर १५ हजार बेड्सची आवश्यकता असल्याचं या समितीने सांगितले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Strike : सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप तुर्तास स्थगित मात्र 11 नोव्हेंबरला करणार निदर्शने आंदोलन!

माधवी खंडाळकर कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत? राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप

Crime: जावयानं माझ्या मुलीला मारलं, सासूची तक्रार... मात्र सत्य समोर आल्यानंतर तोंड लपवावं लागलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला

Pune Crime: आधी खून मग लोखंडी भट्टीमध्ये पत्नीचा मृतदेह जाळला; पुण्यातल्या वारजे भागात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT