Delhi riots accused Umar Khalid esakal
देश

Delhi Riots : दंगलीतील आरोपी उमर खालिदची तिहार तुरुंगातून सुटका; 'या' कारणासाठी 7 दिवसांचा जामीन मंजूर

तुरुंगात असलेल्या उमर खालिदच्या बहिणीचं लग्न ठरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीत जातीय हिंसाचार उसळला होता. या दंगलीत 53 लोकांचा मृत्यू तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते.

दिल्ली दंगलीत (Delhi Riots) मोठा कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालिदच्या (Umar Khalid) बहिणीचं लग्न ठरलंय. या कारणास्तव उमरनं दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयात (Karkardooma Court) जामीन अर्ज दाखल केला होता. ही याचिका ग्राह्य धरून न्यायालयानं त्याला आठवडाभरासाठी जामीन मंजूर केलाय.

न्यायालयाचा आदेश मिळताच, आज (शुक्रवार) सकाळी त्याची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. उमरच्या सुटकेची बातमी समजताच तुरुंगाबाहेर अनेक लोक त्याला भेटायला आले होते.

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोर्टाकडून एक आठवड्याचा जामीन मिळाला आहे. उमर खालिदला 23 डिसेंबरला सकाळी 7 वाजता तिहारमधून सोडण्यात आलं. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला हा जामीन मिळाला. जामिनाच्या अटींनुसार, उमरला 30 डिसेंबरला परत तुरुंगात यावं लागणार आहे.'

'या' अटींसह मिळाला जामीन

न्यायालयानं खालिदला अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्या अंतर्गत तो कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधू शकणार नाही. याशिवाय, तो पुराव्यांशी छेडछाडही करणार नाही. खालिदला त्याचा फोन नंबर तपास अधिकाऱ्यांना द्यावा लागणार असून अंतरिम जामीन मिळेपर्यंत तो क्रमांक चालू राहील. शिवाय, उमर दररोज तपास अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करेल.

उमर 27 महिन्यांपासून तुरुंगात

फेब्रुवारी 2020 मध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ईशान्य दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या दंगलीत 53 लोकांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी उमरला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. तो गेल्या 27 महिन्यांपासून तुरुंगात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तमिळनाडूत मोठा ट्विस्ट! थलापती विजय मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार; काँग्रेसने डीएमकेसोबतची युती तोडली, एका अटीवर टीव्हीकेला पाठिंबा

Tamil Nadu Politics : दिल्लीची पुनरावृत्ती की नवी खेळी? 'थलपती'च्या TVK ला पाठिंबा देताना काँग्रेस पुन्हा तीच मोठी चूक करतेय? पक्षासाठी ठरणार धोक्याची घंटा?

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Jammu Kashmir Prepaid SIM Rules : जम्मू-काश्मीरमध्ये आपलं प्रीपेड सिमकार्ड का चालत नाही? 99% लोकांना माहिती नाही, 'हे' आहे कारण

IPL 2026 फायनल अहमदाबादला! बंगळुरूने मान गमावला, play off चं वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT